राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी - राजेंद्र शिंगणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:29 AM2020-09-15T04:29:25+5:302020-09-15T06:50:38+5:30

अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आॅक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

Adequate stock of oxygen in the state, all districts should register in advance - Rajendra Shingane | राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी - राजेंद्र शिंगणे

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी - राजेंद्र शिंगणे

Next

मुंबई : राज्यात आॅक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आॅक्सिजनअभावी रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. आॅक्सिजनच्या वितरणात अडचणी येणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. सर्व जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आॅक्सिजनची आगाऊ नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी सोमवारी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आॅक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. राज्यात दररोज एक हजार मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होते. त्या तुलनेत सध्याची गरज ५०० मेट्रिक टन आहे. दिवसेंदिवस मागणी वाढत असली तरी कोरोना झालेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ अकरा टक्के रुग्णांनाच आॅक्सिजन द्यावे लागते. राज्यातील कक्षात १२ हजार तर अतिदक्षता विभागातील ७,८४० रुग्णांना आॅक्सिजन देण्याची गरज भासते.
वाहतूक व्यवस्थेच्या अडचणींमुळे कुठेही आॅक्सिजनची कमतरता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शिंगणे यांनी दिल्या. काही अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सध्या काही ठिकाणी ठरावीक वेळेतच आॅक्सिजन पुनर्भरण केले जाते. ते आता २४ तास सुरू ठेवावे, उत्पादकांकडील मोठे टँकरसुद्धा संबंधित विभागांच्या परवानगीने वैद्यकीय आॅक्सिजन किंवा त्याच्या द्रव घटकांसाठी वापरावेत, आदी सूचना त्यांनी दिल्या.

आॅक्सिजन पुरवठ्यासह मास्कच्या किमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसिवीर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला आॅक्सिजनचा साठा याचाही शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.

कोरोनाविरुद्धचा लढा
आता घरोघर पोहोचवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कोरोनाविरुद्धचा लढा आपण घराघरात पोहोचवा, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

Web Title: Adequate stock of oxygen in the state, all districts should register in advance - Rajendra Shingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.