Cyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:33 PM2021-05-17T17:33:47+5:302021-05-17T17:35:02+5:30
Cyclone Tauktae: मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे.
मुंबई:तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचून आढावा घेतला. मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. (aditya thackeray appeals mumbaikars to stay home safely during cyclone tauktae)
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. वादळाची तीव्रता सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ११४ किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ असून झालेल्या परिणामांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
Visited the Disaster Management room of the @mybmc to take an update on the current situation of the cyclone Tauktae. We are doing everything we can to keep you safe.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2021
For your safety, stay home. For any emergencies, call 1916
(1/5) pic.twitter.com/k4U8eRe7qQ
विनाकारण घराबाहेर पडू नका
कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहतेय. वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच १६० मिमी, १२० मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होत आहे. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मोठी बातमी! तौक्ते चक्रीवादळात मुंबई हायजवळ बोटीवर 273 कर्मचारी अडकले; नौदल मदतीला धावले
बीकेसी कोव्हिड सेंटरचे नुकसान नाही
बीकेसी येथील कोव्हिड सेंटरचे मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील २४३ कोविड बाधित रुग्णांना शनिवारी रात्रीच इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती सर्व कार्यवाही करण्यात आली आहे.