खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:16 PM2022-08-14T22:16:15+5:302022-08-14T22:18:22+5:30
Aditya Thackeray : शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. मात्र उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा कारभारापेक्षा सरकारवरच लक्ष्य केंद्रित केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४१ दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला ५ दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
When the focus is on Government and not Governance, it takes 41 days for cabinet expansion (with a promise of another one), and then 5 days for portfolio allocation (with a major imbalance of power), in a dispensation with no representation for women and State’s capital- Mumbai.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 14, 2022
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवण्यात आली आहेत.