आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी जन्माला आले, म्हणून मंत्री झाले; बावनकुळे यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:53 PM2022-11-04T23:53:05+5:302022-11-04T23:54:24+5:30
"एक चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे. मोदींच्या आठ वर्षांतच्या कार्यक्रमांना ब्रेक लावण्याचे काम मध्यंतरी अडीच वर्ष झाले."
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुण्या परिवारातून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या घरात जन्माला यावे लागते, तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, तेव्हा राहुल गांधी देशाचे नेते होतात. इंदिरा गांधीच्या घरातील असावे लागते तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होतात. पण भाजप एक असा पक्ष आहे, जेथे रस्त्यावर चहा विकणारा एक छोटा कार्यकर्ताही देशाचा पंतप्रधान होतो आणि देशाला जगात सर्वशक्तीशाली देश बनविण्याचे स्वप्न बघतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटले आहे. ते भिवंडीत येथे एका सभेत बोलत होते.
आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला आभिमान -
बावनकुळे म्हणाले, जेव्हा आपण एक मत देतो तेव्हा सरकार बनते आणि जे सरकार बनते ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांच्या जीवनाचा निर्णय करते. ते सरकार बनविण्यासाठी जे मत असते, ते मत भाजपला मिळाले आहे. यामुळेच मोदीजी पंतप्रधान झाले आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला आभिमान आहे.
भिवंडीत येणारी सर्व कामे उद्धव ठाकरे सरकारने रोखली -
एक चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे. मोदींच्या आठ वर्षांतच्या कार्यक्रमांना ब्रेक लावण्याचे काम मध्यंतरी अडीच वर्ष झाले. जनकल्यानाची योजना अडीच वर्ष उद्धव ठाकरे सारकारने रोखली होते. भिवंडीत येणारी सर्व कामे उद्धव ठाकरे सरकारने रोखली होते. कारण राज्य सरकार जोवर हो म्हणत नाही. तोवर केंद्र सरकारकडून कितीही निधी आला तरी तो जनतेच्या कामी येत नाहीत, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.