जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:56 PM2024-10-15T18:56:53+5:302024-10-15T18:58:25+5:30

आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल करत आगामी निवडणुकीत मशाल धगधगणार असल्याचा दावा केला आहे.

Aditya Thackeray criticized the grand coalition government as soon as the Maharashtra assembly elections were announced | जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!

जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!

Shiv Sena Aditya Thackeray ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. निवडणुका जाहीर होताच नेत्यांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनाही धार आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल करत आगामी निवडणुकीत मशाल धगधगणार असल्याचा दावा केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ज्या क्षणाची महाराष्ट्रातले आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. २० नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस आहे. गेल्या २ वर्षात महाराष्ट्राला लुटणाऱ्या शिंदे-भाजपला हुसकावून लावण्यासाठी आपल्याला बदल घडवायचा आहे. आम्ही न्यायसंस्थेकडून न्यायाची वाट पाहत होतो, पण आता जनताच न्याय करणार आणि मशाल धगधगणार," असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा, कसा आहे निवडणूक कार्यक्रम?

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. "महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर हा असेल, तर ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज  मागे घेण्याची मुदत असणार आहे," अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
 
 

Web Title: Aditya Thackeray criticized the grand coalition government as soon as the Maharashtra assembly elections were announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.