महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटलं; त्यांनीच सांगितलं नेमकं काय झालं!...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 07:52 PM2020-07-01T19:52:12+5:302020-07-01T20:07:14+5:30
महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरे हे अचानक उठून बाहेर गेल्याने सोशल मीडियावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते
मुंबई - आज आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाची महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरे हे अचानक उठून बाहेर गेल्याने सोशल मीडियावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता स्वत: आदित्य ठाकरे यांनीच पुढे येत त्यावेळी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा ट्विट करून केला आहे.
या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, माझी खुशाली विचारणारे असंख्य मेसेज मला सकाळपासून मिळाले आहेत. त्याबाबत मी तुमचे आभार मानतो. पहाटे विठ्ठल मंदिरात महापूजा आटोपल्यानंतर मला डिहायड्रेशनमुळे थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे मी काही काळासाठी बाहेर आलो. मात्र काही वेळात पुन्हा मी पूजेमध्ये सहभागी झालो.
I’ve received tonnes of messages since morning wishing me well. Thank you for your kind wishes. After the puja was done, I experienced uneasiness due to mild dehydration, for which I had to step out, rehydrate and joined the rest of the puja in 5-7 mins.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 1, 2020
तसेच आषाढी एकादशीनिमित्त पूजेसाठी उपस्थित राहायला मिळणे हे आपल्यासासाठी सन्मानीय असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी आई यांच्यासोबत आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रखुमाई माता यांच्या पूजेसाठी मला उपस्थित राहता आले, हे माझ्यासाठी सन्माननीय आहे.
It was an honour to be with the Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray ji and my mother, to seek the blessings of Lord Vitthoba and Rakhumai mata on the auspicious occasion of ashadi ekadashi! pic.twitter.com/Wi89WbORiB
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 1, 2020