Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

By ओमकार संकपाळ | Published: July 7, 2022 07:37 PM2022-07-07T19:37:04+5:302022-07-07T19:37:14+5:30

'गद्दार हे गद्दारच असतात, पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच राहणार.'

Aditya Thackeray: 'If you want to come back to Shiv Sena, then' Aditya Thackeray's appeal to rebel MLA | Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

googlenewsNext


मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत संसार थाटला. यानंतर ठाकरे गटातील नेते सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यातच आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीदेखील शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला, तसेच स्वगृही परतण्याचे आवाहनही केले.

पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत

'गद्दार हे गद्दारच...'
आज शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गद्दार हे गद्दारच असतात, पण ज्या आमदारांना परत शिवसेनेत यायचं आहे, त्यांच्यासाठी दारं उघडे आहेत', असे आदित्य म्हणाले. तसेच, "शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत, पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार,' असंही ते म्हणाले.

एक रिक्षावाला आमदार आणि दुसरा मुख्यमंत्री- प्रताप सरनाईक 
बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मीडियाशी संवाद साधत ठाकरेंवर निशाणा साधला. डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच पहिला धक्का ठाकरे सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का दिला होता. त्यानंतर आता शिंदे सरकारने ठाकरेंनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. 29 जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती, त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: Aditya Thackeray: 'If you want to come back to Shiv Sena, then' Aditya Thackeray's appeal to rebel MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.