...तर ही वेळ आली नसती! आदित्य ठाकरे हे छोटा पप्पू; अब्दुल सत्तार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:36 AM2022-10-28T11:36:57+5:302022-10-28T11:37:39+5:30
हा प्रकल्प गुजरातला गेला त्याचे पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे सुप्रीमो यांचे वडील यांचं आहे असा आरोप सत्तारांनी आदित्य ठाकरेंवर केला.
औरंगाबाद - आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. आपल्यावरील खापर दुसऱ्याच्या माथी मारायचं. हे सर्व पाप २०२१ मधील आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करायचं. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे. तरुणाचे डोके भडकवायचे हे राजकारण नसते. तुम्हाला अडीच वर्ष दिले त्यात तुम्ही काय केले हे सांगा. तुम्ही स्वत:चे आमदार सांभाळू शकला नसाल मग राज्य कसं सांभाळलं हे सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत हा प्रकल्प गुजरातला गेला त्याचे पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे सुप्रीमो यांचे वडील यांचे आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनाच विचारावा हा प्रकल्प कसा गेला, कुणामुळे गेला. याची चौकशी लावावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे. प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची कारणं महाराष्ट्रात आहेत. राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे तो प्रकल्प गेला. आता विरोधकांकडे काही काम राहिले नाही. आता शाखांपर्यंत जात आहेत. हे चांगले काम शिंदेंनी केले. एकनाथ शिंदे १८ तास काम करतात. त्यांच्या आदेशानुसार रात्री २ वाजेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना भेटतो. शेतकऱ्यांना ५० हजाराचं अनुदान शिंदे सरकारने दिले. केवळ घोषणा मागील सरकारने केली परंतु अंमलबजावणी झाली नाही असा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.
दरम्यान, गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच जुलै, ऑगस्टचं नुकसान भरपाई सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर आले. विरोधक नवनवीन पुड्या सोडतात. आस्मानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार करत आहे. लवकरच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर केंद्र, राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना मदत करेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"