APMC Election Result 2023 : 'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 07:45 PM2023-04-30T19:45:03+5:302023-04-30T19:45:51+5:30
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे.
APMC Election Result 2023 : काल राज्यातील राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. या निकालानंतर रुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच, भविष्यातील राजकीय परिस्थितीवरही अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, या निकालांवर माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रिक्रिया दिली आङे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध शिवसेना- भाजप युती अशी लढत पाहायला मिळाली. या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. दरम्यान या निकालावरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की इथे गद्दारीला स्थान नाही आणि हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 30, 2023
आदित्य ठाकरेंनी ट्वीट केले की, 'कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की, इथे गद्दारीला स्थान नाही आणि हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे,' अशी टीका त्यांनी केली.