युती तोडण्यात आदित्य ठाकरेचा मोठा वाटा; दीपक केसरकर यांचा आरोप
By समीर देशपांडे | Published: January 2, 2024 02:54 PM2024-01-02T14:54:54+5:302024-01-02T14:56:56+5:30
ज्या मतदारसंघातून ज्या पक्षाचे खासदार निवडून आलेत. त्यांना तिथे पुन्हा उमेदवारी दिली जाते.
कोल्हापूर शिवसेना भाजप युती तोडण्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचा आराेप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. शिवसंकल्प अभियान तयारीसाठी ते कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
केसरकर म्हणाले, ज्या मतदारसंघातून ज्या पक्षाचे खासदार निवडून आलेत. त्यांना तिथे पुन्हा उमेदवारी दिली जाते. हे गेली काही वर्षे पाळले गेलेले सूत्र आहे. त्यानुसार कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघ आमच्याकडे राहतील. परंतू याचा अंतिम निर्णय मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर होईल.
तसेच आमच्या शिवसेनेचे राज्यभरातील प्रतिनिधी कोल्हापूर येथे हेाणाऱ्या अभियानासाठी येणार आहेत. तर कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्वतंत्र जाहीर सभा होणार आहे. लोकसभेचे अधिवेशन एक दिवस अलिकडे आल्याने अजूनही तारीख निश्चित झालेली नाही असं अभियानावर केसरकर म्हणाले