मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:22 PM2023-11-23T15:22:00+5:302023-11-23T15:22:32+5:30

संपूर्ण महाराष्ट्र हा आमच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Aditya Thackeray targets Chief Minister Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

सिंधुदुर्ग - विधानसभा निवडणुका जाहीर होऊ द्या, या ४० लोकांना निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत नाही. मु्ख्यमंत्र्यांना स्वत:च्या मतदारसंघात उभे राहण्याची हिंमत नाही. नाहीतर ते राजीनामा देऊन पुन्हा उभे राहिले असते. ३१ डिसेंबरपर्यंत हे सरकार टिकेल. त्यानंतर हे सरकार दिसणार नाही असा निशाणा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्या ट्विटनंतर काहींचे परदेश दौरे रद्द झाले, नवी मुंबई मेट्रो सुरू झाली, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस दिले गेले. अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले असतानाही उद्घाटनाअभावी रखडले आहेत. तुम्हाला परराज्यात जाऊन प्रचार करण्यास वेळ आहे परंतु राज्यात उद्घाटनाला वेळ नाही. अनेक उद्योग गुजरातला पळवले जातायेत, वर्ल्डकप फायनलही गुजरातला नेली. कृषी क्षेत्र कोलमडलंय, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतंय. संपूर्ण महाराष्ट्र हा आमच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच  खळा बैठकीला राजकीय रंग देऊ नका, आम्ही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत. अंगणात ही बैठक होतेय. एवढे पदाधिकारी, शिवसैनिक येतायेत काही ठिकाणी जागा अपुरी पडतेय. या बैठकीमुळे वेगळा उत्साह शिवसैनिकांमध्ये आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नांदेड यासारख्या सर्व जिल्ह्यात आम्ही शासकीय रुग्णालयात गेलो, पाहणी केली.त्याठिकाणी सरकारकडून औषध पुरवठा होत नव्हता. डॉक्टर, नर्सेस रुग्णांची सेवा करतायेत परंतु त्यांना ज्या सुविधा पुरवायच्या त्या पुरवल्या जात नव्हत्या. त्यामुळे रुग्णालयांची अवस्था बिकट झाली. उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असा आरोप त्यांनी केला. 

दरम्यान, लोकसभा, विधानसभा असो सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे. ३१ तारखेपर्यंत खोके सरकार टिकेल, त्यानंतर पडणार आहे. आम्ही रस्ता जनतेसाठी उघडला आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले. मुंबईत एक बिल्डर मंत्री आणि एक पालकमंत्री आहेत त्यांना आज उद्घाटनाला वेळ मिळाला म्हणून आज उद्घाटन करतायेत. मला आधी सांगितले असते तर मी याआधीच कोकण दौरा केला असता असा टोलाही आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. 
 

Web Title: Aditya Thackeray targets Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.