आदिवासींना मिळतो गवतविक्रीतून रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 03:04 AM2016-10-17T03:04:53+5:302016-10-17T03:04:53+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे.

Adivasis get employment from grasses | आदिवासींना मिळतो गवतविक्रीतून रोजगार

आदिवासींना मिळतो गवतविक्रीतून रोजगार

Next


विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. त्यामुळे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार, ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरत आहे. तालुक्यातील खेडोपाडी दिवाळी सणाआधी गवत खरेदीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. वर्षभर रोजगारासाठी स्थलातंरित होणाऱ्या या शेतकऱ्यांना रोजगार मिळत असला तरी व्यापारी त्यांची मोठी लूट करीत असल्याचे वास्तव खरेदीविक्रीच्या व्यवहारावरून दिसून येत आहे.
पावसाळ्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणारे गवत विकून काही अंशी आदिवासी पाड्यात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हलाखीचा असल्याने व या महिन्यात गौरी-गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. मात्र, या दिवसांत सर्व संकटांवर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या आदिवासीबांधवांना मोठा आधार ठरतो. माळरानातील गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, आलोन्डा, या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. (वार्ताहर)
>अशी होते फसवणूक
या व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ४ ते ५ रुपये गवत कापणाऱ्यास तर जागामालकास ५ रुपये मिळतात. मजुरांना या गवतकापणीचे दिवसभरातून केवळ १०० ते १२० रुपये मिळतात. तर जागा असलेल्या मालकाला क्विंटलमागे केवळ ७० ते ८० पर्यंत मिळतात. मात्र, व्यापारी क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रुपये मिळवतो. त्यामुळे या व्यवसायात व्यापाऱ्याचाच फायदा जास्त आसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचा ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पाहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालसोपारा, बोरिवली, भिवंडी, येथील गायीम्हशींच्या गोठ्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे.

Web Title: Adivasis get employment from grasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.