आदिवासींनी महामार्ग रोखला
By admin | Published: August 5, 2014 12:54 AM2014-08-05T00:54:26+5:302014-08-05T00:54:26+5:30
तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला.
Next
मुंबई : अनुसूचित जातीत समावेश करण्याची मागणी करत राज्यभर तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने आदिवासी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी आंदोलनकत्र्या आदिवासी पारधी विकास समन्वय समितीने केली.
धनगर समाजाला स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण असून त्यांना आदिवासी म्हणून सामील करून घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा समितीचे अध्यक्ष अजरुन काळे यांनी दिला. ते म्हणाले, ‘राज्यात आदिवासींच्या 45 जमाती असून 2क्क् पोटजाती आहेत. या सर्वाना केवळ 7 टक्के आरक्षण आहे. त्यातही धनगर समाज घुसखोरी करू पाहत आहे. शिवाय, धनगर समाजाचे नेते सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करत आहे. सरकारने धनगर समाजाला कोणतेही आश्वासन देऊ नये, म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी कातकरी सामाजिक संस्था आणि विविध 45 आदिवासी संघटनांनी मिळून आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष आंदोलन सुरू केल्याचे काळे यांनी सांगितले.
याआधी सोमवारी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 1क् वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात केली. दोन तास धरणो दिल्यानंतर आंदोलकांनी सांताक्रूझच्या दिशेने धाव घेतली. (प्रतिनिधी)