आरोप निश्चितीवरील सुनावणी तहकूब
By admin | Published: October 23, 2016 01:52 AM2016-10-23T01:52:44+5:302016-10-23T01:52:44+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी शनिवारी सीबीआयने युक्तिवादास
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी शनिवारी सीबीआयने युक्तिवादास सुरुवात केली. मात्र बचावपक्षाच्या वकिलांनी वेळ मागितल्याने ही सुनावणी थेट १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयकडून तपास पूर्ण होण्यास सव्वा वर्ष लागल्याने हा खटला सुरू होऊ शकला नाही. शुक्रवारी सीबीआयने अंतिम तपास अहवाल सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारपासून आरोप निश्चितीसाठी सीबीआयला युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीबीआयच्या वकिलांनी शनिवारी युक्तिवादास सुरुवात केली. मात्र बचावपक्षाचे वकील आबाद पौडा यांनी सुनावणी तहकूब करण्याची विनंती विशेष न्यायालयाला केली. ‘सीबीआयने शुक्रवारी २०० पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. ते लगेच वाचून युक्तिवाद करणे शक्य नाही. तसेच सीबीआयने आणखी एका साक्षीदाराच्या जबाबाची प्रत दिली नाही. त्यामुळे त्या जबाबाची प्रत मिळावी,’ अशी विनंती अॅड. आबाद पौंडा यांनी केली. (प्रतिनिधी)