प्रशासनाचे सहकार्य चांगले! - मुख्यमंत्र्यांची प्रशस्ती

By admin | Published: April 21, 2016 04:44 AM2016-04-21T04:44:14+5:302016-04-21T04:44:14+5:30

अधिकारी ऐकत नाहीत, अशी तक्रार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गेल्या दीड वर्षात प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाल्याचे प्रशस्तिपत्र देऊन प्रशासकीय सेवेतील

Administration cooperation is good! - Chief Minister praises | प्रशासनाचे सहकार्य चांगले! - मुख्यमंत्र्यांची प्रशस्ती

प्रशासनाचे सहकार्य चांगले! - मुख्यमंत्र्यांची प्रशस्ती

Next

मुंबई : अधिकारी ऐकत नाहीत, अशी तक्रार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गेल्या दीड वर्षात प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाल्याचे प्रशस्तिपत्र देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथीगृहावर झाला, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या दीड वर्षांत विविध उपक्रम प्रशासनाने यशस्वी करून दाखिवले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
ग्रामविकास व जलसंधारण विभाग : रा. वि. गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग - शेखर सिंग (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग), अनिल बागल (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग). अभिमन्यू काळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड), जी. एल. रामोड (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड). महेंद्र कल्याणकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर), रवींद्र मोहिते (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर), भुजंग गजभिये (गट विकास अधिकारी, बल्लापूर), शैलेश नवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर), उज्ज्वला बावके (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर), नामदेव ननावरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड), मधुकर वासनिक (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीड).
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : अविनाश पाटील (सहसचिव, नगरविकास विभाग), विजय पाटील (कार्यकारी अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका), संजय निर्मल (सहायक अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका), शिवाजी पाटील (सहसंचालक, उद्योग विभाग), संजय कोरबू (सहसंचालक, उद्योग), डॉ. पी. अन्बलगन (सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), विनोद जाधव (महाव्यवस्थापक, महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ), उपसंचालक नरेश देवराज, सहायक आयुक्त विश्वास जाधव, सहायक आयुक्त विश्राम देशपांडे (सर्व कामगार विभाग), सहआयुक्त व्ही.व्ही. कुलकर्णी (विक्र ीकर विभाग), मुख्य महाव्यवस्थापक वाय.एम. गडकरी (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण संस्था), सहसचिव तिवारी (महसूल व वने), अतिरिक्त नियंत्रक कैलास पगारे (वैध मापन शास्त्र विभाग).
कृषी व पदुम विभाग : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी बाळासाहेब संपतराव नितनवरे, कृषी सहायक उमेश काशिनाथ शेळके (सर्व जि. अहमदनगर). मुख्य पोस्ट मास्तर जनरल कार्यालय, मुंबई - अधीक्षक युनुस नूर मोहम्मद (पोस्ट आॅफिस, ठाणे पश्चिम), वरिष्ठ अधीक्षक आर. पी. पाटील (पोस्ट आॅफिस, कोल्हापूर)
महसूल व वनविभाग : तुकाराम मुंढे (जिल्हाधिकारी, सोलापूर), दीपेंद्र कुशवाह (जिल्हाधिकारी, नाशिक), प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद), राधाकृष्णन बी. (जिल्हाधिकारी,रत्नागिरी), सचिन कुर्वे (जिल्हाधिकारी, नागपूर), पांडुरंग पोले (जिल्हाधिकारी, लातूर), नविलकशोर राम (जिल्हाधिकारी, बीड), अश्विन मुद्गल (जिल्हाधिकारी, सातारा), किरण गित्ते (जिल्हाधिकारी, अमरावती). राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान : सहसंचालक सुधाकर ग. सिद्धेवाड, लेखा अधिकारी रवींद्र जोगी, कनिष्ठ लेखापाल स्नेहल गुल्हाने, सहायक लेखा अधिकारी राजेश भुयार, लेखा लिपिक शिवदत्त सालबर्डे (सर्व लेखा व कोषागरे, अमरावती)नगरविकास विभाग : एस. शिवशंकर (आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका), अभिजित बापट (मुख्याधिकारी, सातारा नगर परिषद), विद्या पोळ (मुख्याधिकारी, पाचगणी नगर परिषद), रामदास कोकरे (मुख्याधिकारी, वेंगुर्ला नगर परिषद).

 

Web Title: Administration cooperation is good! - Chief Minister praises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.