प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात
By admin | Published: May 16, 2016 12:51 AM2016-05-16T00:51:14+5:302016-05-16T00:51:14+5:30
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.
पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (दि. १६) सकाळी १० वाजल्यापासून आॅनलाईल प्रवेश अर्जातील पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थी, पालक व शाळांमधील शिक्षक ँ३३स्र://स्र४ल्ली.ा८्नू.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरू शकतील, असे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ७३ हजार जागांसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा ज्या माध्यमिक शाळांमधून दिली आहे याच शाळांमध्ये जाऊन आॅनलाईन प्रवेशाचा अर्ज भरावयाचा आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांकडून अधिकेचे शुल्क आकारता येणार नाही. विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक व प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून अर्ज भरता येईल. बाहेर गावाहून आलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाच्या प्रमुख केंद्रांवर जाऊन आॅनलाईन अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे राज्य मंडळाशिवाय इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
>कसा भरावा अर्ज
विद्यार्थ्यांनी ँ३३स्र://स्र४ल्ली.ा८्नू.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. माहिती पुस्तिकेबरोबर मिळालेला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरावा. तसेच संगणकावर दिल्या जाणा-या सुचनांनुसार टप्प्या-टप्प्याने अर्ज भरून पूर्ण करावा. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरून घेतला जाणार आहे, याची नोंद घ्यावी.
सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेतच भरून घ्यायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खासगी क्लास चालकांकडून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू नये. काही शाळांकडून विद्यार्थ्यांचे 20 -20 चे गट करण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासून दररोज 20 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरणार आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 10 दिवस प्रवेश अर्ज भरण्यास मुदत दिली जाणार आहे.
- मीनाक्षी राऊत