राज्यातील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 07:57 PM2019-06-01T19:57:50+5:302019-06-01T20:03:14+5:30
राज्यातील ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवार (दि. ३) पासून सुरू होणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्तळावर सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज भरता येईल. विभागाने निश्चित केलेल्या अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका मिळेल.
राज्यातील ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेता येणार नाही. एकुण ८२ ट्रेडसाठी ही प्रक्रिया असून १ लाख ३७ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकुण चार नियमित व एक समुपदेशन फेरी होणार आहे. विद्यार्थ्यांना दि. ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. पहिल्या प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता यादी दि. ९ जुलै रोजी प्रसिध्द होईल. त्यानंतर प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र निवड यादी प्रसिध्द करून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातील. नियमित चार फेऱ्यांची प्रक्रिया दि. १० ऑगस्टपर्यंत पुर्ण केली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी संस्थांमध्ये दि. ३ ते ३० जूनदरम्यान दररोज सकाळी १० ते ११ यावेळेत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच संचालनालयाने अर्ज स्विकृती केंद्र निश्चित केली आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळेल. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी करणे, स्विकृती आणि निश्चिती करता येईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अजार्ची छापील प्रत घ्यावी लागले. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करता येईल. प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
------------
संकेतस्थळ - https://nvshq.org/admission/dvet-maharashtra-iti-admission-application-form/
-----------
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती, छापिल प्रत घेणे - दि. ३ ते ३० जून
प्रवेश अर्ज निश्चित करणे - दि. ६ जून ते १ जुलै
पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. ६ जून ते १ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी - दि. ४ जुलै
गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे - दि. ४ व ५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी - दि. ९ जुलै
निवड यादी- दि. १० जुलै
निवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. ११ ते १५ जुलै
दुसºया प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. १२ ते १६ जुलै
दुसरी निवड यादी - दि. १९ जुलै
निवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. २० ते २४ जुलै
तिसºया प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. २१ ते २५ जुलै
तिसरी निवड यादी - दि. २९ जुलै
निवड यादीनुसा प्रवेश घेणे - दि. ३० जुलै ते २ ऑगस्ट
चौथ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. ३१ जुलै ते ३ ऑगस्ट
चौथी निवड यादी - दि. ६ ऑगस्ट
निवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. ७ ते १० ऑगस्ट
नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चिती - दि. २२ जुलै ते १० ऑगस्ट
समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी - दि. १३ ऑ गस्ट
शासकीय संस्थांसाठी समुपदेशन फेरी दि. १२ ते १८ ऑगस्ट
खासगी संस्थास्तरावरील प्रवेश - दि. १० जुलै ते ३१ ऑगस्ट