मुले आॅनलाइन दत्तक घ्या!
By Admin | Published: February 28, 2015 05:00 AM2015-02-28T05:00:27+5:302015-02-28T05:00:27+5:30
आॅनलाइन शॉपिंगच्या ट्रेंडमधून प्रेरणा घेत किंवा सर्वच खात्यांचा ई-कारभार सुरू करण्याच्या हौसेपोटी आता देशात मुले-मुली आॅनलाइन दत्तक घेण्याची वादग्रस्त योजना केंद्रीय
संदीप प्रधान,मुंबई
आॅनलाइन शॉपिंगच्या ट्रेंडमधून प्रेरणा घेत किंवा सर्वच खात्यांचा ई-कारभार सुरू करण्याच्या हौसेपोटी आता देशात मुले-मुली आॅनलाइन दत्तक घेण्याची वादग्रस्त योजना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी लागू करण्याचे निश्चित केले आहे. मूल दत्तक घेणे ही भावनिक प्रक्रिया असून त्यामध्ये कुणी, कुठले मूल दत्तक घेतले त्याची गोपनीयता बाळगणे गरजेचे असल्याची बाब मेनका यांनी दुर्लक्षित केली आहे.
मुले दत्तक देण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात येणार असल्याचे गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या अनाथालयांच्या परिषदेत जाहीर केले. यापुढे मूल दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि अनाथ मुले यांची देशभरात एकच यादी तयार केली जाणार आहे. ज्या पालकांना मूल हवे असेल त्यांना व दत्तक दिल्या जाणाऱ्या मुलांची नोंदणी केली जाणार आहे. दत्तक मूल हवे असलेल्या पालकांना एकाचवेळी स्क्रीनवर सहा मुलांचे फोटो दिसतील. त्यापैकी दोन मुले त्यांनी सिलेक्ट करायची व त्यापैकी एक दत्तक घ्यायचे, अशी मेनका यांची योजना आहे. महाराष्ट्रातील मूल दूरवरच्या राज्यात दत्तक दिले गेले तर त्याची काळजी नीट घेतली जाते किंवा कसे यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अनाथालयातील समाजसेविकेवर सोडण्यात येणार आहे. या योजनेला विरोध करण्याचे संस्थांनी ठरवले आहे.