सीएसटी पनवेल व चर्चगेट विरार दरम्यान उन्नत मार्ग - सुरेश प्रभू
By admin | Published: February 25, 2016 01:12 PM2016-02-25T13:12:54+5:302016-02-25T14:05:55+5:30
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलदरम्यान उन्नत मार्गाची तसेच चर्चगेट विरार दरम्यानही एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेट सादर करताना केली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलदरम्यान उन्नत मार्गाची तसेच चर्चगेट विरार दरम्यानही एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेट सादर करताना केली आहे. मुंबईतील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्यात येणार असल्याचेही प्रभूंनी सांगितले.
मुंबई अहमदाबाद यांच्या दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या कामास सुरुवात झाल्याचे प्रभूंनी सांगितले असून जपान सरकारच्या मदतीने हायस्पीड कॉरीडॉर उभारण्यात येणार असल्याचे प्रभू म्हणाले.
कुठेही अपघात होतात आणि प्रवासी प्राणास मुकतात तेव्हा मला प्रचंड दु:ख होतं असं सांगणा-या रेल्वेमंत्र्यांनी अपघातमुक्त रेल्वेसाटी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बजेटशी संबंधित सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.