म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी मे महिन्यात जाहिरात, जूनमध्ये सोडत
By admin | Published: April 18, 2016 06:00 PM2016-04-18T18:00:00+5:302016-04-18T18:00:00+5:30
म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीची लॉटरी यंदा गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीनंतर निघणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८- म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीची लॉटरी यंदा गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीनंतर निघणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली आहे. त्यामुळे म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात येणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत निघणार आहे.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी यावेळी म्हाडा हजारो घरं लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. मात्र घरांची संख्या अद्यापही म्हाडाकडून जाहीर करण्यात आली नाही. मुंबई पश्चिम उपनगरातल्या गोरेगावमधल्या सिद्धार्थनगर 1 आणि 2 मधील घरांसाठी लॉटरी निघणार आहे. लॉटरीत मुलुंडमध्येही घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
म्हाडाची गिरणी कामगारांसाठी असणारी घरांची लॉटरी येत्या एका महिन्यात निघणार आहे. 22 एप्रिलला म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांची लॉटरी येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिली. मुंबईत 2 हजार 678 घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढली जाणार असल्याची माहिती आता समोर येते आहे.