अंधेरीहून मुंबईला लोकांनी यावं म्हणून रेल्वे करायची जाहिरात
By admin | Published: February 23, 2016 06:20 PM2016-02-23T18:20:02+5:302016-02-23T18:25:33+5:30
बांद्रे व अंधेरीसारख्या लांबच्या ठिकाणी राहणा-यांना मुंबईतली दुकानं व सिनेमाहॉल पाहण्यासाठी रेल्वेनं खास सुविधा दिली असून रेल्वेनं येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई - रेल्वे बजेट दोन दिवसांवर आलं असून प्रवासी भाडं वाढेल का ? गाड्यांची संख्या वाढेल का ? नी कर्जत कसारा किंवा वसई विरारहून येणा-या लाखो प्रवाशांना दक्षिण मुंबईतल्या ऑफिसमध्ये पोचता येण्यासाठी गाडीत चढता येईल का ? असे शेकडो प्रश्न आहेत.
या पार्श्वभूमीवर एक गमतीदार जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही एक जाहिरात आहे 1930 च्या दशकातील. ही जाहिरात आहे बीबीसीआय रेल्वेची, म्हणजे आपल्या रेल्वेची जी त्यावेळी बाँबे बडोदा सेंट्रल रेल्वे होती.
या जाहिरातीमध्ये वांद्रे व अंधेरीसारख्या लांबच्या ठिकाणी राहणा-यांना मुंबईतली दुकानं व सिनेमाहॉल पाहण्यासाठी रेल्वेनं खास सुविधा दिली असून रेल्वेनं येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
अंधेरी ते वांद्रे दरम्यान कुठल्याही स्थानकावर दुपारी 2.45 नंतर प्रवास करा असं सांगण्यात आलं असून एकेरी तिकिट सात आणे तर रिटर्न तिकिट 14 आणे असल्याचं नमूद करण्यात आलंय. तसेच रिटर्न तिकिट रात्रीच्या शेवटच्या गाडीपर्यंत चालेल असंही स्पष्ट करण्यात आलंय.
रेल्वेला जाहिरात करावी लागत होती यावरून त्यावेळी अंधेरी व वांद्रे या उपनगरांची स्थिती काय असावी आणि रेल्वे किती आरामदायी असावी याचा अंदाज येतो.