म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी जाहीरात

By admin | Published: July 9, 2017 08:37 AM2017-07-09T08:37:03+5:302017-07-09T08:37:03+5:30

सर्वसामान्यांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीची जाहीरात बुधवार, 12 जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता

Advertisement Wednesday for MHADA houses | म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी जाहीरात

म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी जाहीरात

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 9 - घरांच्या किमती गगनाला भिडल्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांची नजर म्हाडाच्या लॉटरीकडे असते. दरम्यान सर्वसामान्यांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीची जाहीरात बुधवार, 12 जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.  
 म्हाडाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या लॉटरीसाठी म्हाडा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी म्हाडा कार्यालयातही बैठकांचे सत्र सुरू आहे. यंदा म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटासाठी 322, मध्यम उत्पन्न गटासाठी 226 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 168 अशा एकून 784 घरांची लॉटरी निघणार आहे.  मात्र यंदाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाचा समावेश करण्यात आला नसल्याचे वृत्त आहे . पण अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांचा शोध सुरू आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यावर्षी म्हाडाच्या घरांच्या किमती वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
 
 लॉटरी प्रक्रिया डिजिटल करण्याकडे म्हाडाचा कल 
सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आपल्या लॉटरी प्रक्रियेत दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशेषत: अर्जदारांना अनामत रक्कम भरताना अडथळे येऊ नयेत म्हणून लॉटरी प्रक्रिया डिजिटल करण्याकडे म्हाडाचा कल अधिक आहे. याच प्रक्रियेंतर्गत यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व आॅनलाइन पेमेंटसह एनईएफटी व आरटीजीएस हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
(अधिक वाचा -  म्हाडाची ‘डिजिटल’ लॉटरी )
   
म्हाडा सदनिका सोडतीसाठी आता एनईएफटी, आरटीजीएसचा पर्याय
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व ऑनलाइन पेमेंटसह एनईएफटी (National Electronic Funds Transfer) व आरटीजीएस (Real Time Gross Settlelment) हा पर्यायही अर्जदार नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे,  अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे यांनी दिली.
 

Web Title: Advertisement Wednesday for MHADA houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.