दारूला महिलांचे नाव देण्याचा सल्ला, महाजन यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:28 AM2017-11-06T05:28:08+5:302017-11-06T05:28:13+5:30

विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Advice to give names of women to alcohol, Mahajan's remarks protest across the state | दारूला महिलांचे नाव देण्याचा सल्ला, महाजन यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध

दारूला महिलांचे नाव देण्याचा सल्ला, महाजन यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध

Next

जळगाव/नंदुरबार : विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी महाजन यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
शहादा येथे सातपुडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी पश्चिम महाराष्ट्रात विविध मद्याची नावे स्त्रीवाचक असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे़ त्यामुळे सातपुडा साखर कारखान्यानेही त्यांच्या ब्रँडचे नाव ‘महाराणी’ करावे, असा सल्ला दिला.
साखर कारखान्यांच्या मद्यार्क निर्मिती ब्रँडची नावे भिंगरी, ज्युली असे असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे़ स्त्रीवाचक नावे असलेल्या गुटखा उत्पादनांचा खपही वाढतो आहे, असे ते म्हणाले. मात्र आपण हे सर्व गमतीने बोलत आहोत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. वंदना चव्हाण यांनी पुण्यात केली. तर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे महाजन यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्या प्रतिमेला चपला मारून तसेच दारुच्या रिकाम्या बाटल्या फोडून निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Advice to give names of women to alcohol, Mahajan's remarks protest across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.