महाधिवक्ता मांडणार सरकारी पक्षाची बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2016 01:03 AM2016-01-15T01:03:49+5:302016-01-15T01:03:49+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने आता महाधिवक्ता श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायाधीश साधना जाधव रजेवर असल्याने खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापुरात चालणार की अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला. या खटल्यात महाधिवक्त्याची नियुक्ती करावी, अशी विनंती शैला दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांतर्फे त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
समीरच्या मागणीस विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तपास अधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी
गुरुवारी न्यायालयात सादर केले. खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी बुधवारी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)