“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 04:13 PM2023-10-14T16:13:16+5:302023-10-14T16:14:40+5:30

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

advocate gunratna sadavarte slams manoj jarange patil over maratha reservation sabha | “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. आरक्षण उच्च वर्गासाठी नसते. मनोज जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. शरद पवार त्यांच्या पाठिशी आहेत. जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचे ज्ञान नाही. काही आकलन नाही, मनोज जरांगे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. 

मनोज जरांगे यांना अटक करावी, याबाबत गृहसचिव आणि पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांनी पत्र लिहिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षणाचा आम्हाला आदर आहे. स्वत:ला मराठा म्हणता मग ओबीसींमधून आरक्षण कशाला मागता. परिस्थिती कळाली पाहिजे. तुमच्याच बोलण्यातून ते फेल झाले आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. 

हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला

अत्याचाराची भाषा केली. पोलिसांना धमकी दिली. आम्ही तक्रार आणि नोटीस रितसर दिली आहे. गुन्हे जे यांनी मागच्यावेळी केले आहेत. बसेस जाळल्या, यांच्याकडून वसुली करण्यात येईल. जो समाज कायम राज्यकर्ता आहे. हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला आहे. त्यामुळे आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असते, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. काहीतरी मृगजळ दाखवून लोकांना एकत्र आणून गलिच्छ राजकारण केले जात आहे. हे राजकारण शरद पवार हेच करत आहेत. त्यांचाच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे, असा मोठा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. 

दरम्यान, माझ्या 'एक मराठा लाख मराठा' घोषणेवर टीका त्यांनी केली. पण, ही घोषणा जातीवाचक नाही. ही गोष्ट सैन्यातील आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत होते. बरगळत होते. मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. याठिकाणी लोक येतात आणि मौजमजा करुन निघून जातात. त्याप्रकारे त्याठिकाणी काही वैचारिक घडले नाही. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे होते. यावरुन त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

 

Web Title: advocate gunratna sadavarte slams manoj jarange patil over maratha reservation sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.