आॅटोरिक्षा, टॅक्सीतही जीपीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:49 AM2017-07-29T04:49:59+5:302017-07-29T04:50:07+5:30
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आॅटोरिक्षा व टॅक्सीमधे जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आॅटोरिक्षा व टॅक्सीमधे जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
मागील काही दिवसांत आॅटोरिक्षा व टॅक्सीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: ठाणे शहरात आॅटोरिक्षा चालकांनी मुलींवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्टेशनमधील घटनेनंतर पोलीस व
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी मोहीम राबवून ७२१२ आॅटोरिक्षा तपासण्यात आल्या.
१०४ आॅटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून, १०८ रिक्षाचालकांचे
लायसन्स निलंबित केले आहे. सन २०१६-१७मध्ये ठाण्यात १७ हजार वाहने दोषी आढळली. त्यात ३५३ जणांचे परवाने रद्द केले आहेत. ५५५ लोकांकडे परवाने नसल्याचे आढळले. ३ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांनी
दिली. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य किसन कथोरे, संग्राम थोपटे, संजय केळकर यांनी भाग घेतला.