हवाई छायाचित्रणाचा ‘बादशहा’ हरपला!

By Admin | Published: May 18, 2014 01:13 AM2014-05-18T01:13:28+5:302014-05-18T01:13:28+5:30

हवाई छायाचित्रणासाठी लोकप्रिय असलेले ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे (7क्) यांचे नैनिताल येथे शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास निधन झाले.

Aerial photography 'Badshah'! | हवाई छायाचित्रणाचा ‘बादशहा’ हरपला!

हवाई छायाचित्रणाचा ‘बादशहा’ हरपला!

googlenewsNext
>मुंबई : हवाई छायाचित्रणासाठी लोकप्रिय असलेले ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे (7क्) यांचे नैनिताल येथे शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास निधन झाले. छायाचित्रणासाठी जिम कॉर्बेट अभयारण्यात गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर, तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र, उपचारादरम्यानच बोधे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. 
रविवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. बोधे यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच रोजगाराकरिता हाती कॅमेरा घेतला. मूळचे सांगलीचे असणा:या बोधे यांनी अनेक वर्षे हेलिकॉप्टरमधून टिपलेली देशभरातील दीपगृहे, मुंबईची मनोहारी दृश्ये, महाराष्ट्रातील गड-किल्ले यांचे संकलन आकर्षक कॉफी टेबल पुस्तकांमध्ये केले. त्यांच्या निधनाने छायाचित्रण क्षेत्रचे मोठे नुकसान झाल्याची हळहळ दिग्गजांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aerial photography 'Badshah'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.