Afghanistan Taliban Crisis: १० वर्ष नागपूरात राहत होता ‘हा’ तालिबानी; पोलिसांनी केली होती अटक, आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:25 PM2021-08-20T19:25:07+5:302021-08-20T19:26:39+5:30
अफगाणिस्तानीतल अनेक व्हिडीओत आपल्याला तालिबानी हत्यारासह सरकारी कार्यालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा केल्याचं पाहायला मिळत आहे
नागपूर – तालिबानने(Taliban) अफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अमेरिकेचे सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानातील तालिबानींच्या क्रुरतेचा रोज नवनवीन व्हिडीओ समोर येत आहेत. इतकचं नाही तर अफगाणिस्तानी यापुढे लोकशाही नसणार असंही तालिबानींनी स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तानीतल अनेक व्हिडीओत आपल्याला तालिबानी हत्यारासह सरकारी कार्यालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी एका तालिबानींचा फोटो खूप व्हायरल होत आहे. त्याचं महाराष्ट्रातील नागपूरचं खास कनेक्शन उघडकीस आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या तालिबानीचं नाव नूर मोहम्मद उर्फ अब्दुल हक असं आहे. तालिबानी संघटनेशी तो जोडलेला आहे. हा तालिबानी नागपूरमध्ये १० वर्ष वास्तव्यास होता.
या तालिबानीला महाराष्ट्र पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी म्हणजे २३ जून २०२१ रोजी त्याला अफगाणिस्तानला देण्यात आले होते. आता त्याच्या हातात हत्यार असलेला फोटो जगभरात व्हायरल होत आहे. नागपूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे नूर मोहम्मदला १६ जून २०२१ रोजी अटक केली होती. पोलिसांच्या तपासात आढळलं की, नूर मोहम्मदच्या शरीरावर बंदुकीचे अनेक निशाण आहेत. त्याच्याकडे तालिबानींचे अनेक व्हिडीओ सापडले होते. त्याचसोबत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे सापडले होते. पोलिसांनी ही माहिती मिळताच २३ जून २०२१ रोजी नूर मोहम्मदला अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधत त्याला अटक केली आणि अफगाणिस्तानला डिपोर्ट केले.
एलएमजी मशीन गनसोबत नजर आला नूर
परंतु आता नूर मोहम्मदचा एक फोटो समोर आला आहे. त्यातून या तालिबानी नूरचा क्रूर चेहरा उघड झाला. या फोटोत नूर एलएमजी मशीन गनसह आढळून येत आहे. त्याचसोबत त्याच्याकडे अनेक बुलेट आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय सुरक्षा एजेन्सीने नागपूर पोलिसांना माहिती दिली आहे. सध्या याबाबत पोलीस काहीही स्पष्ट बोलायला तयार नाहीत.
नागपूर पोलीस विभागातील विशेष शाखेचे डीसीपी बसवराज तेली यांनी सांगितल्यानुसार, आमच्या विभागाकडे सध्या असं कुठलंही तंत्रज्ञान नाही जेणे हा फोटो नूर मोहम्मदचा आहे हे कळेल. सध्या या प्रकरणावर काही भाष्य करू शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.