तब्बल १९ वर्षानंतर लोणार सरोवरातील ऐतिहासिक "सासू सुनेच्या विहिरीचे" दर्शन

By Admin | Published: May 12, 2017 01:24 PM2017-05-12T13:24:01+5:302017-05-12T13:53:51+5:30

 सासु सुनेची विहीर तब्बल 19 वर्षानी सरोवराचे पाण्यामध्ये घट झाल्याने उघड झाली आहे.

After 19 years, the historical "Mother of the well-known wells" of Lonar Sagar is present | तब्बल १९ वर्षानंतर लोणार सरोवरातील ऐतिहासिक "सासू सुनेच्या विहिरीचे" दर्शन

तब्बल १९ वर्षानंतर लोणार सरोवरातील ऐतिहासिक "सासू सुनेच्या विहिरीचे" दर्शन

googlenewsNext

लोणार : लोणार सरोवराला त्रिवेणी संगम असे म्हटल्या जाते या ठिकाणी वैज्ञानिक , ऐतीहासीक , व पौराणीक असे संबोधले जाते याच त्रिवेणी संगमामध्ये असलेली पौराणीक कथेमध्ये  असलेली  सासु सुनेची विहीर तब्बल 19 वर्षानी सरोवराचे पाण्यामध्ये घट झाल्याने उघड झाली आहे.
लोणार सरोवर हे जागतीक किर्तीचे सरोवर म्हणुन प्रसिध्दी आहे या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहावयास मिळते तो म्हणजे उल्का पडल्यामुळे लोणार हे सरोवर तयार झाले त्यामुळे यास वैज्ञानिक दृष्टीने पाहील्या जात आहे  , तर लोणार नगराचा पहीला संदर्भ ऋग्वेदमध्ये आला असल्यामुळे या ठिकाणी विष्णुचे मुख्य 10 अवतार असल्यामुळे या शहराला पौराणीक असे सुध्दा संबोधल्या जाते तर ऐतीहासीक म्हणुन सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार असल्याचे अनेक ठिकाणी नोंद असल्यामुळे लोणार सरोवरास त्रिवेणी संगम म्हणुन ओळखल्या जाते अशा त्रिवेणी संगमापैकी एक संगम म्हणजे पौराणीक कथेनुसार पुराणमध्ये लोणार सरोवरामध्ये कमळजा देवीचे मंदीर आहे पौराणीक कथरेनुसार अगस्ति ऋषीची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात आले असता सितेची ओटी देवीने भरली होती तसेच तपश्चर्या केली होती ही भक्ताना पावन होनारी देवी आहे मोठया मोठया संतानी व ऋषीनी तपश्चर्या केली व त्यांना देवीनं दर्शन दिले मराठवाडा , खानदेश, विदर्भ मधील ब-याच कुळाची ही कुलदेवता आहे मंदीरासमारे एक विहीर आहे तिला योनी कुंड (सौभाग्य तिर्थ)असे सुध्दा संबोधल्या जाते त्या कुंडास सासु सुनेची विहीर सुध्दा म्हटल्या जाते यामध्ये सासु सुनेची विहीरी म्हणजेच एकाच विहीरीतील पाण्याची चव ही वेगवेगळी असुन देवीकडील बाजुची चव ही गोड असल्यामुळे तिला सुनेंची विहीर तर सरोवराकडील विहीरीतील पाणी खारट असल्यामुळे तिला सासुची विहीर असे सुध्दा बोलल्या जाते अशा आगळया वेगळया विहीर गेल्या 19 वर्षापासुन पाण्यामध्ये बुडाली होती मात्र गत ४ वर्षापासून झपाट्याने खालावत चाललेल्या लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत यावर्षी अजुनच वाढ झाली. वाढत्या तापमानामुळे व अपुरया पावसामुळे पाण्याची पातळी किमान १0० फुट कमी झाली. ही विहीर सन १९९८ मध्ये सहजगत्या दृष्टीस पडली होती, मात्र सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक पणे वाढल्यामुळे ही  विहीर परत पाण्यात लुप्त झाली.मात्र गेल्या ४ वर्षापासून आटत चाललेल्या पाण्याच्या पातळी मुळे ही "सासुसुनेची विहीर" गेल्या ८ दिवसांपासून पुर्णपणे पाण्याच्या पातळी वर आलेली आढळली.त्यामुळे सरोवरातील ऐतीहासीक पुराणौकाळामध्ये नोंद असलेली सासुसुनेची विहीरीचे दर्शन आजच्या युवकाना होत आहे

Web Title: After 19 years, the historical "Mother of the well-known wells" of Lonar Sagar is present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.