21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

By admin | Published: September 16, 2016 07:08 AM2016-09-16T07:08:21+5:302016-09-16T12:55:09+5:30

तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. भावपूर्ण वातावरणात अरबी समुद्रात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला

After the 21-hour procession, the Lalbaug's King was immersed | 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर सकाळी 8 च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अरबी समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागचा राजा सकाळी सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा लवकर चौपाटीवर दाखल झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल 20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.

गेले १० दिवस मुक्काम केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या गावी निघाले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी केली होती. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला. 

कोल्हापुरात तब्बल २५ तासांनी संपली विसर्जन मिरवणूक
विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी सकाळी ८ वाजता खासबाग मैदान येथुन सुरु झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल २५ तासांनी संपली. आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता पापाची तिकटी येथे शेवटच्या क्रांती युवक मंडळाच्या  गणपतीची आरती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते झाली. या वर्षी पापाची तिकटी येथील पालीका बुथ वर ३३० इतक्या तरुण मंडळाची नोंद झाली व इतर तरुण मंडळांनी पर्यायी मार्गाचा वापर केला.

Web Title: After the 21-hour procession, the Lalbaug's King was immersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.