२६ महिन्यांनंतर परळी औष्णिक केंद्रातील संच सुरू
By admin | Published: April 26, 2015 01:54 AM2015-04-26T01:54:07+5:302015-04-26T01:54:07+5:30
येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ३ हा तब्बल २६ महिन्यानंतर सुरू झाला आहे.
Next
परळी : येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ३ हा तब्बल २६ महिन्यानंतर सुरू झाला आहे. फेब्रुवारी २०१३ पासून हा संच कोळसा, पाणीटंचाईमुळे बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी या संचातून वीजनिर्मितीला सुरुवात झाली.
बॉयलर ट्युबमध्ये कोटिंग करून नैसर्गिक थंड करणे, पाणी, केमिकल्स, आॅइल वापरून पाच दिवसांच्या प्रक्रियेनंतर गुरुवारी सकाळपासूनच या संचातून वीजनिर्मिती सुरू झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता पंढरी काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)