पंतप्रधानांकडून ४ वर्षांनंतर अण्णांच्या कार्याची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:58 AM2018-04-23T01:58:48+5:302018-04-23T01:58:48+5:30
देशातील भाजप खासदार, आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधताना अण्णा हजारे यांच्या कामाची माहिती देऊन राळेगणसिद्धीत विद्यार्थ्यांची आॅनलाइन हजेरी, पाणलोट कामे, सीसीटीव्हीची जोडणी आदी सामूहिक प्रयत्नांतून केलेल्या गावाच्या विकासाची माहिती देशभर पोहोचवा, अशी सूचना केली.
पारनेर (जि. अहमदनगर) : गेल्या चार वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एकाही पत्राला कोणतेही उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच राळेगणसिद्धीचे ‘आदर्श गाव मॉडेल’ देशभर पोचवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना भाजपा आमदार-खासदारांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिल्या आहेत.
शेतकºयांच्या प्रश्नांसह मोदी लोकपालवरही काम करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सुमारे ४३ पत्र अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवली. त्यापैकी एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. शिवाय अण्णांच्या दिल्लीतील आंदोलनाकडेही पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, सुमारे चार वर्षांनंतर पंतप्रधानांनी अण्णांच्या कामाची दखल घेतली. देशातील भाजप खासदार, आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधताना अण्णा हजारे यांच्या कामाची माहिती देऊन राळेगणसिद्धीत विद्यार्थ्यांची आॅनलाइन हजेरी, पाणलोट कामे, सीसीटीव्हीची जोडणी आदी सामूहिक प्रयत्नांतून केलेल्या गावाच्या विकासाची माहिती देशभर पोहोचवा, अशी सूचना केली. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण स्वीकारल्या असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.