मराठी व्यक्तीला ४० वर्षांनी पुन्हा लष्करप्रमुखाचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:42 AM2019-12-17T06:42:32+5:302019-12-17T06:42:49+5:30

लेफ्ट. जनरल मनोज नरवणे यांची निवड

After 40 years, honor to became army chief again for Marathi people | मराठी व्यक्तीला ४० वर्षांनी पुन्हा लष्करप्रमुखाचा मान

मराठी व्यक्तीला ४० वर्षांनी पुन्हा लष्करप्रमुखाचा मान

Next

नवी दिल्ली : पुण्याचे सुपुत्र आणि भारतीय लष्कराचे विद्यमान उपप्रमुख लेफ्ट. जनरल मनोज नरवणे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून निवड झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर जनरल नरवणे यांच्या रूपाने ४० वर्षांनंतर लष्कराचे नेतृत्व मराठी व्यक्तीकडे जाईल.


सध्याचे लष्करप्रमुख जनरल विपिन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नरवणे सूत्रे  स्वीकारतील. संरक्षण मंत्रालयाने या पदासाठी लेफ्ट. जनरल नरवणे यांच्यासह लेफ्ट. जनरल रणवीर सिंग व लेफ्ट. जनरल एस. के. सैनी या तीन अधिकाऱ्यांची नावे पाठविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यातून जनरल मनोज नरवणे या सर्वांत ज्येष्ठ अधिकाºयाची निवड केली.


आता सरसेनापती या नात्याने राष्ट्रपती जनरल नरवणे यांची औपचारिक नेमणूक करतील. जून १९८० मध्ये शिख लाइट इन्फन्ट्रीच्या सातव्या तुकडीत लेफ्ट. या पदावर लष्करात रुजू झालेल्या लेफ्ट. जनरल नरवणे यांना यंदाच्या १ सप्टेंबर रोजी उपलष्करप्रमुखपदी नेमण्यात आले होते. ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक महत्त्वाची पदे सांभाळलेल्या जनरल नरवणे यांना परम विशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ठ सेवापदक, सेनापदक व विशिष्ठ सेवा पदक अशा लष्करी पुरस्कारांनी शिक्षण तेथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व डेहराडून येथील इंडियन डिफेन्स अकादमीमध्ये लष्करी शिक्षण घेतले.सामरिक आणि युद्धशास्त्राचे ते पदव्युत्तर पदवीधरही आहेत. चित्रकला, योग व बागकामाचे भोक्ते असलेले जनरल नरवणे यांच्या पत्नी वीणा या शिक्षिका आहे. नरवणे दाम्पत्यास दोन मुली आहेत.

Web Title: After 40 years, honor to became army chief again for Marathi people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.