स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर जिल्ह्यातील ३० वाड्या उजळणार

By admin | Published: September 24, 2015 12:28 AM2015-09-24T00:28:19+5:302015-09-24T00:29:51+5:30

दीनदयाळ योजना : पायाभूत सुविधा निर्माण करणार--- नरेंद्र इंदुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

After 68 years of independence, 30 wards of the district will be lit | स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर जिल्ह्यातील ३० वाड्या उजळणार

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर जिल्ह्यातील ३० वाड्या उजळणार

Next

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही जिल्ह्यातील ३० वाड्या, वस्त्या, धनगरवाडे अंधारात आहेत. पायाभूत सुविधाच नसल्यामुळे ‘महावितरण’ची वीज तेथे जाऊन पोहोचलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या प्रशासनाने केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेतून वीज देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.जिल्ह्यात वाड्या, वस्त्या मिळून एकूण १२१७ गावे आहेत. यामध्ये १०२८ ग्रामपंचायती आहेत. दहा शहरे आहेत. शहरांतील सर्व वसाहतींमध्ये, उपनगरांत वीज आहे. मुख्य गावांतही वीज आहे; पण भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या तालुक्यांतील वाड्या, धनगरवाडे विजेपासून वंचित आहेत. या वाड्यांत शंभरपासून पाचशेपर्यंत लोकसंख्या आहे. डोंगराळ प्रदेश, वन विभागाची जमीन, कमी लोकसंख्या या प्रमुख कारणांमुळे तिथे वीज गेलेली नाही. दरम्यान, केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय योजनेतून महावितरणच्या प्रशासनाने वीज नेण्यासाठी ३० गावांचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ३३ कोटी रुपये मिळणार आहेत. यातून ३० वाड्यांवर वीज पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. याशिवाय खराब झालेले विद्युत खांब व वाहिन्या बदलणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणे, आदी कामे केली जाणार आहेत. प्रस्तावांना मंजुरी मिळून निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण होऊन या उन्हाळ्यात वीज नेण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे.


जिल्ह्यातील ३० वाड्यांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दीनदयाळ योजनेतून प्रस्ताव दिले आहेत. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल.
- नरेंद्र इंदुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण


वीज नसलेल्या वाड्या :
भुदरगड - बेडीव धनगरवाडा, हेदवडे धनगरवाडा, गिरगाव धनगरवाडा, पाटीलवाडी सोनबाचा वाडा, हंड्याचा वाडा, यरंडपे धनगरवाडा, मेघोली धनगरवाडा, भाटवाडी, मळी, तळी, कलापूर. कागल - पाटील वसाहत. राधानगरी - धनगरवाडा (ब), हसनगाव धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, सावंतवाडी धनगरवाडा, पाटीलवाडी, येताळवस्ती, लिंधडे वस्ती, कोपाचा धनगरवाडा, हरिजन वस्ती. शाहूवाडी - धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, अंबाई धनगरवाडा, नाईकबाचा माळ. चंदगड - धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, बंदराई, नगरगाव. गडहिंग्लज -लमाणवाडा.

Web Title: After 68 years of independence, 30 wards of the district will be lit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.