६९ वर्षांनंतर खगोलअभ्यासकांना पर्वणी : चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश

By Admin | Published: November 14, 2016 10:17 PM2016-11-14T22:17:30+5:302016-11-14T22:17:30+5:30

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी राहिल्याने जळगावकरांना सुपरमूनचे मनोहारी दर्शन सोमवारी घडले

After 9 years, the astronomers have the highest mountain: the moon is 14 percent larger and 30 percent more light | ६९ वर्षांनंतर खगोलअभ्यासकांना पर्वणी : चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश

६९ वर्षांनंतर खगोलअभ्यासकांना पर्वणी : चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी राहिल्याने जळगावकरांना सुपरमूनचे मनोहारी दर्शन सोमवारी घडले. ६९ वर्षानी झालेल्या या घटनेमुळे खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी ठरली. सोमवारी रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश देणाऱ्या चंद्राचे दर्शन जळगावकरांना झाले.

पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. सोमवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर दोन लाख ५६ हजार ५११ किलोमीटर इतके राहिले. नियमित दिवशी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर तीन लाख ८१ हजार इतके असते. रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा सोमवारी चंद्र १४ टक्के मोठा दिसत होता. ३० टक्के जादा प्रकाश देत असल्याने खगोल अभ्यासकांसाठी चंद्राचे निरीक्षण ही पर्वणी ठरली.

८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. यापुढे सन २०३४ मध्ये सुपरमून पहायला मिळणार आहे. त्यावेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर २ लाख २१ हजार ४८५ इतके राहणार आहे. आजच्या दिवशी चंद्र हा गोलाकार न फिरता लंबवर्तुळाकार फिरत असतो.


गेल्या ६९ वर्षांनंतर सुपरमून दिसणार आहे. रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा दिसत होता. सुपरमूनच्या पर्वणीच्या वेळी गुरुत्वाकर्षण वाढत असल्याने भूकंप, त्सुनामीची शक्यता सर्वाधिक असते. या काळात भरती व आहोटी जास्त प्रमाणात होते.
सतीश पाटील, खगोल अभ्यासक, जळगाव.

Web Title: After 9 years, the astronomers have the highest mountain: the moon is 14 percent larger and 30 percent more light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.