गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

By Admin | Published: September 5, 2014 11:36 PM2014-09-05T23:36:16+5:302014-09-05T23:36:16+5:30

निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे.

After the absence of Gauri, the full market collapsed | गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

googlenewsNext
ठाणो : हरतालिका गणोशचतुर्थी आणि गौरी स्थापना यावेळी मुळातच आवक कमी व अपु:या आवकेतील निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे. 
एकीकडे मागणी घटली आणि आहे त्या आवकेत वाढ झाली यामुळे ही घट घडून आली आहे. त्यामुळे जो एक फुटी हार 4क् रुपयांना मिळत होता तो आता 2क् रुपयांवर आला आहे. चायनीज गुलाबाच्या 1क् ते 12 फुलांची जूडी 2क् ते 3क् रुपयांना होती ती आता 1क् ते 15 रुपयांवर आली आहे. गावठी लाल गुलाबाची जूडी 25 ते 35 रुपये होती. ती आता 1क् ते 15 रुपयांना आहे. 2क् ते 25 रुपयाचा गजरा आता 5 ते 1क् रुपयांना आहे. लीली आणि निशिगंध यांचे मध्यम आणि मोठय़ा उंचीचे हार देखील 6क् ते 8क् रुपयांऐवजी आता 4क् रुपयांवर आले आहेत. कमवायचे दिवस होते. तेव्हा कमावले. आता रुटीन धंदा सुरु झाला आहे. अशी भाषा फुलविक्रेते करीत आहेत. 5 रुपयांना मिळणारी 21 दुर्वाची जूडी आता 2 ते 3 रुपयांना झाली आहे. 5 रुपयाला एक असणारे जास्वंद आता 1क् रुपयांना 3 ते 4 नग मिळू लागले आहेत. सोनचाफा जो 5 आणि 7 रुपयांना होता तो आता 2 रुपये नगावर आला आहे. जास्वंदीच्या 5 ते 7 कळ्यांचा वाटा आता 1क् रुपयाला मिळू लागला आहे. एकाच वेळी सुटय़ा विक्रीसाठी आणि हारांसाठी कंठी, गजरे, वेण्या यासाठी फुलांची मागणी वाढल्याने त्याचा फायदा विक्रेत्यांनी करून घेतला. असे बाजारातील जाणकारांचे म्हणणो आहे. अनेकांनी पूजा साहित्यासाठी लागणा:या फुलांची उपलब्धता सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी थोडी-थोडी आणि टप्प्या-टप्प्यात केल्यामुळे विक्रेत्यांकडे माल असूनही बाजारात टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले. असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या आवक जरी वाढली असली तरी ती गरजे इतकीच आहे. परंतु घराघरातील गौरी गणपतींचे विसजर्न झाल्याने तात्कालीक मागणी घटली. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
गणोश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कल्याणच्या फुल बाजारात 1क्5 टन फुले आली. तर गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी केवळ 37 टन फुले बाजारात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
फूल विक्रेते व्यापारी असोशिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले की,  पावसामुळे बाजार पडला. अनेक व्यापा:यांवर निम्म्यांपेक्षा जास्त माल फेकून देण्याची वेळ आली. त्यांचे नुकसान झाले. गणोशोत्सव व त्यातच मालाची आवक कमी झाल्याने परिणामी किंमती वाढल्या. 
बटन गुलाब 2क् नगाचा एक गुच्छ 3क् ते 4क् रूपये दराने विकला  जात होता आता त्यांची किंमत कमी होऊन तो 25 रू.ना ग्राहकांना मिळत आहे. जरबेरा 8क् रू.  वरून आता 3क् ते 4क् रू. ना मिळत आहे.  फूल विक्रेते गुरनाथ पारनेर यांनी सांगितले की, गौरी विसजर्नाच्या दिवशी लिलीचा चमकी गुंफलेला हार एक हजार रू. किंमतीला विकला गेला. तर गुलाब व लिलीच्या पाकळयांचा हार 4क्क् रू. किंमतीला विकला गेला. 45 रूपयांपासून एक हजार रूपयार्पयत हारांच्या किंमती होत्या. 45 रू.चा  हार आता 25 रू. ना मिळत आहे. तर निशिगंधचा मोठा हार 25क् ते 3क्क् रू. ला मिळत होता. ही फूल महाग असल्याने हा हार आजही त्याच भावाने विकला जात आहेत.  
दादरला फुलांची मोठी बाजारपेठ आहे. कल्याण,कसारा आणि कजर्त परिसरातील फूल विक्रेते दादरला जात. कल्याणला सात विक्रेत्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. कल्याण बाजार समितीत फूल मार्केट सुरू झाले. सात विक्रेत्यावरून फुल विक्रेत्यांचा संख्या आज मितीस 354 वर पोहचली आहे. जुन्नर, आळेफाटा, बोटा, अकोला, पुणो, बारामती, डहाणू, वसई आणि बंगलोरहून माल येतो. 

 

Web Title: After the absence of Gauri, the full market collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.