अखेर मेडिकलची रक्तपेढी सुरू

By admin | Published: November 13, 2015 12:27 AM2015-11-13T00:27:41+5:302015-11-13T00:27:41+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली.

After all, the blood bank started | अखेर मेडिकलची रक्तपेढी सुरू

अखेर मेडिकलची रक्तपेढी सुरू

Next

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली. एफडीएच्या या आडमुठेपणामुळे का होईना, मेडिकलला तडकाफडकी चार मशीन खरेदी करता आल्या आणि यामुळे रुग्णांना दर्जायुक्त रक्तघटक मिळण्याची सोय उपलब्ध झाली.
मेडिकलच्या रक्तपेढीच्या तपासणीवेळी एफडीएच्या चमूला रक्तपेढीत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. त्रुटी दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश २८ आॅक्टोबर रोजी दिले होते.
त्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स काऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध झाल्यावरच परवानगी देणार अशी भूमिका औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी घेतली. यामुळे अडचणीत सापडलेल्या मेडिकल प्रशासनाने कधी नव्हे ते केवळ पाच दिवसांत सुमारे २५ लाखांच्या चार मशिनी खरेदी केल्या. मात्र मशीन स्थापनेत उशीर झाल्याने परवानगी मिळायला अकरा दिवस लागले. या दरम्यान मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या डेंग्यू, मलेरियाच्या गंभीर रुग्णांसह इतरही रुग्णांना ‘प्लेटलेट’, ‘प्लाझमा’, ‘रेड ब्लड सेल्स’ आणि ‘वाईट ब्लड सेल्स’साठी पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून रक्तघटक विकत घ्यावे लागले. मंगळवारपर्यंत मशीन स्थापन झाल्याच्यानंतर त्याचा अहवाल मेडिकल रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांनी एफडीएला दिल्यावर चमूने तपासणी केल्यावर रात्री उशिरा मंजुरी दिली. गुरुवारपासून रक्तघटक वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मेडिकल प्रशासनासह रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: After all, the blood bank started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.