अखेर हिरवे गावची नळपाणी योजना सुरू

By admin | Published: April 27, 2016 04:22 AM2016-04-27T04:22:53+5:302016-04-27T04:22:53+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली हिरवेगावची नळपाणी योजना परिवर्तन आणि रोटरी क्लब ठाणे सेंट्रल याच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आहे.

After all, the implementation of Nalpani scheme of Hirve Gaon started | अखेर हिरवे गावची नळपाणी योजना सुरू

अखेर हिरवे गावची नळपाणी योजना सुरू

Next

मोखाडा : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली हिरवेगावची नळपाणी योजना परिवर्तन आणि रोटरी क्लब ठाणे सेंट्रल याच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आहे.
३३३ लोकसंख्या असलेल्या हिरवे गावात शासनाने लाखो रुपये खर्च करून सन २००९-१० च्या दरम्यान नळ पाणीपुरवठा योजना राबविली होती. परंतु हजारो रूपयांच्या थकीत वीज बिलामुळे गेल्या अनेक वषार्पासून ही योजना बंद होती. शासनाने लाखोचा खर्च करून देखील त्याचा काहीच फायदा हिरवेवासिंयाना झाला नव्हता परंतु आता ही योजना या सामाजिक संस्थाच्या प्रयत्नामुळे सुरू झाली असल्याने येथील गावकऱ्यांना त्याचे आभार मानले आहेत.
ही नळ पाणी योजना सौर उर्जेवर चालणारी आहे. यामुळे तिला विजेची गरज भासणार नाही त्यामुळे ती अखंडीत चालू राहणार आहे. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असे परिवर्तन संस्थेच्या सीईओ वर्षाताई परचुरे यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: After all, the implementation of Nalpani scheme of Hirve Gaon started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.