अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 05:24 AM2016-07-21T05:24:35+5:302016-07-21T05:24:35+5:30
भार्इंदर रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटली
मीरा रोड : भार्इंदर रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून वीरेंदर अर्जुन सहानी (२५) असे त्याचे नाव आहे. तो भार्इंदरच्या गणेश आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे.
वीरेंदर हा गणेश आनंदनगर झोपडपट्टीत भाड्याच्या खोलीत १० ते १२ सहकाऱ्यांसह राहत होता. तो भार्इंदरमधील एका स्टीलच्या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला होता. कामावर असताना तो निराश असायचा. लवकर निघायचा, असे सूत्रांनी सांगितले.
१० जुलैला भार्इंदर रेल्वे स्थानकातील फलाट ६ वर सायंकाळी चर्चगेटला जाणारी लोकल पकडण्यासाठी प्रवासी थांबले होते. त्यावेळी महिलांच्या डब्याजवळ थांबून लोकल येताच त्याने रुळांवर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. त्यानंतर, ती व्हायरल झाली होती. यानंतरही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अल्याचे वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बागवे म्हणाले.(वार्ताहर)