नोटाबंदीनंतर संतोषनगर भाम गावाची कॅशलेसकडे वाटचाल

By admin | Published: January 6, 2017 02:23 PM2017-01-06T14:23:29+5:302017-01-06T14:26:43+5:30

देशाला कॅशलेस बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची आता गावागावातून सुरुवात झाली असून पुणे जिल्ह्यातील संतोषनगर भाम या छोट्या खेडेगावाने कॅशलेस कडे वाटचाल सुरु केली आहे.

After the anniversary, Santoshnagar will move towards the cashless house of Bhham village | नोटाबंदीनंतर संतोषनगर भाम गावाची कॅशलेसकडे वाटचाल

नोटाबंदीनंतर संतोषनगर भाम गावाची कॅशलेसकडे वाटचाल

Next
हनुमंत देवकर, ऑनलाइन लोकमत
 
चाकण ( पुणे), दि. ६ - देशाला कॅशलेस बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची आता गावागावातून सुरुवात झाली असून पुणे जिल्ह्यातील संतोषनगर भाम या छोट्या खेडेगावाने कॅशलेस कडे वाटचाल सुरु केली असून गावातील व्यवहार ऑनलाईन होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
 
 पुणे-नासिक महामार्गावरील भामा नदीच्या काठावर हे गाव असून गावाची लोकसंख्या अंदाजे १ हजार ६०० एवढी आहे. पुणे शहरापासून ३७ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव खऱ्या अर्थाने डिजिटल कडे वाटचाल करीत आहे. गावाला जाण्यासाठी एस टी बस व पीएमपीएल बसची सुविधा आहे. या गावाला कॅशलेस करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बँकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या गावातील प्रत्येक गावकऱ्याचे बँकेत खाते आहे. त्यामुळे या गावातील लोक दैनंदिन व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. सरपंच गुलाब कड, उपसरपंच उमेश कड, ग्रामसेवक सुरेश घनवट, तलाठी विटे मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, शिक्षक, बँक अधिकारी व ग्रामस्थ गाव कॅशलेस होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
 
     गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ची एक शाखा असून बँकेतील एटीएम बंद अवस्थेत आहे. गावात पतपेढी व सोसायटी आहे. सोसायटीत साडे तीनशे शेतकरी सभासद आहेत. गावामध्ये एक शासनमान्य रेशनींग दुकान, पेट्रोल पंप, २२ हॉटेल्स, दोन चहाचे स्टॉल्स, १२ पान टपऱ्या, ६ किराणा मालाची दुकाने, २ पिठाच्या गिरण्या, केश कर्तनालय, गॅरेज, वीट भट्ट्या, दोन वेअरहाऊस, चार कंपन्या, वॉशिंग सेंटर, एक मंगल कार्यालय सुद्धा आहे. गावापासून दोन किलोमीटरवर वाकी बुद्रुक येथे पोस्ट ऑफिस आहे. गावात ५०० ते १००० च्या आसपास स्मार्ट फोनधारक आहेत. वीजपुरवठा २४ तास असूनही इंटरनेट सुविधा नाही. फक्त गुरुवारच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होतो. ७०० ते ८०० एकर बागायत जमीन असून कांदा, बटाटा, फुले, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस हि मुख्य पिके असल्याचे सरपंच गुलाब कड यांनी सांगितले.
 
    लोकमतशी बोलताना सरपंच कड म्हणाले कि, गावात जेष्ठ नागरिक वगळता साक्षरतेचे प्रमाण ८० टक्के आहे. परंतु डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर करताना आपल्या मोबाईलवर व्यवहार झाल्याचा जो संदेश इंग्रजीत येतो, तो कमी शिकलेल्या व्यक्तींना वाचता येत नाही, त्यामुळे हे येणारे एसएमएस राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यातील भाषा मराठीतच असावेत. त्यामुळे डिजिटल इंडियाकडे वाटचाल करताना अडचण निर्माण होणार नाही. ते म्हणाले, ग्रामपंचायतीचे खाते जिल्हा बँकेत असून नोटबंदीमुळे विकास कामे रखडली असून ३० डिसेंबर नंतर सुरळीत होईल अशी आम्हाला आशा आहे. कार्डचा वापर करताना पिन नंबर लक्षात राहत नसल्याने आधारकार्डच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करता आले पाहिजेत.
 
         परिसरात असणाऱ्या हॉटेल्स, दुकानदारांकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व नेट बँकिंग मधून व्यवहार केले जात असून त्यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. मागील ६० दिवसांत डिजिटल व कॅशलेसचे व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे. येथील हॉटेल मिरचीचे मालक राजेश पोपट पवार यांनी सांगितले कि, स्वाईप मशीनसाठी अर्ज केला असून डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बिलात १० टक्के सूट जाहीर केली आहे. हॉटेल अशोकाचे मालक शिवाजी लिंभोरे यांनीही इंडियन बँकेकडे स्वाईप मशीन साठी अर्ज केला आहे. मात्र बँकांकडून स्वाईप मशीन मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर जे.के. हॉटेल आणि हॉटेलच्या आवारातील पान शॉप व आईस्क्रीम पार्लर आणि स्नॅक्स सेंटर मध्ये कार्ड स्वाईप करून व्यवहार करीत असल्याचे मॅनेजर संतोष उनवणे यांनी सांगितले. कॅशलेस व्यवहार होत असल्याचे लोकमत पाहणीत आढळले. साहिल पान शॉपचे मालक अशोक कड यांनी घरात सर्व सदस्य एटीएम कार्ड वापरीत असल्याचे सांगून पान शॉपसाठी जरी रोखीने व्यवहार होत असला तरी ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशीन घेणार असल्याचे सांगितले.
 
       येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधील उपव्यवस्थापक विष्णू देव म्हणाले कि, परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आली आहेत. ५० टक्के सभासद त्याचा वापर करीत आहेत. दररोज ३० ते ४० एटीएम कार्ड्स वितरित केली जातात. बँकेचे एटीएम सेंटर लवकरच राजरत्न हॉटेलच्या आवारात सुरु करणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस ( UPI ) हे अप नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने तीन महिन्यापूर्वी लॉंच केले असून बँक ऑफ महाराष्ट्रने युपीआय मार्फत हे अप मधून कोणत्याही बँकेचे ट्रांजक्शन करता येते. येथील ठाकूर पिंपरीत कॅशलेस साठी कार्यशाळा घेण्यात आली असून संतोषनगर साठीही कार्यशाळा घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 माझा मोबाईल, माझी बँक -
 
आता ऑनलाईन ट्रँजॅक्शन करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, ते मोबाईल वरून *९९# द्वारे पेमेंट करू शकतात. त्यामुळे या परिसरातील लोक चेक, मोबाईल अप, *९९#, किसान कार्ड मार्फत छोट्या छोट्या रकमांचे पेमेंट करू शकतात. गावातील सर्व व्यवहार किराणा, भाजी खरेदी, दवाखाना, बी-बियाणे, खते आणि शाळेची फी, ग्रामपंचायतचे व्यवहार, पाणीपट्टी, घरपट्टी, ऑनलाईन ट्रॅनजेक्शन द्वारे स्विकारता येतात, असे बँकेचे अधिकारी देव यांनी सांगितले.

 

Web Title: After the anniversary, Santoshnagar will move towards the cashless house of Bhham village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.