नोटाबंदीनंतर देवस्थानांना कोट्यवधींच्या जुन्या नोटा दान

By admin | Published: December 30, 2016 05:20 AM2016-12-30T05:20:11+5:302016-12-30T09:45:45+5:30

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून देशभर चलन तुटवडा असला, तरी देवस्थानांत दानपेट्या मात्र ओसांडून वाहात

After annotation, donations of millions of old notes to the places of worship | नोटाबंदीनंतर देवस्थानांना कोट्यवधींच्या जुन्या नोटा दान

नोटाबंदीनंतर देवस्थानांना कोट्यवधींच्या जुन्या नोटा दान

Next

- नोटाबंदीनंतर देवस्थानांना मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा
- तुळजाभवानीच्या चरणी 18 लाख
- 35कोटी शिर्डीत
- एक कोटी रुपये आले अंबाबाईच्या दानपेटीत

शिर्डी/तुळजापूर/ कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून देशभर चलन तुटवडा असला, तरी देवस्थानांत दानपेट्या मात्र ओसांडून वाहात आहेत. पन्नास दिवसांत शिर्डीतील साईबाबांच्या दरबारात भाविकांनी तीन किलो सोने, छपन्न किलो चांदी आणि तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे भरभरून दान टाकले आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात १८ लाख, तर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दानपेटीत १.0४ कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
देशभर नोटाटंचाई असली तरी साई संस्थानला नोटाबंदीचा फरक पडला नाही. सार्इंचरणी ४ कोटी ५३ लाखांच्या जुन्या, तर ३ कोटी ८० लाखांच्या नव्या नोटांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी दिली. भाविकांनी साई संस्थानच्या तिजोरीत ३१ कोटी ७३ लाख रोख जमा केली़ यात हुंडीत १८.९६ कोटी, विविध देणग्या ४.२५ कोटी, क्रेडिट व डेबिट कार्डमार्फत २.६२ कोटी, चेक व डीडीद्वारे ३ कोटी ९६ लाख, मनिआॅर्डर ३५ लाख, आॅनलाइन देणगी १.४६ कोटी, दर्शनपासेस ३.१८ कोटी, प्रसादालय अन्नदान देणगी १६ लाख, ७३ लाखांचे दोन किलो नऊशे ग्रॅम सोने, १८ लाखांची ५६ किलो ५०० गॅ्रम चांदीचा समावेश आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

तुळजापूरच्या दानपेटीत हजार-पाचशेच्या नोटा...
महाराष्ट्राचे कुलदैैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातही नोटाबंदीनंतर भाविकांनी हजार-पाचशेच्या जुन्या नोटा दान म्हणून टाकल्या आहेत. पन्नास दिवसांत मंदिरातील दानपेटीत हजार-पाचशेच्या रूपात तब्बल १८ लाख रुपये जमा झाले आहेत.

अंबाबाईच्या दानपेटीत एक कोटी...
कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिराच्या दानपेटीत २८ तारखेपर्यंत १ कोटी
४ लाख ३२ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. याशिवाय आॅनलाईन देणगी, धनादेश, अभिषेक, विविध पूजा यांच्या रकमेची मोजदाद अजून दोन दिवस सुरू राहणार आहे. नोटाबंदीनंतर दानपेटीमध्ये जमा झालेली बहुतांश रक्कम दहा, पन्नास व शंभरच्या चलनात जास्त प्रमाणात आहे.

- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील ३ हजार ६४ मंदिरे आहेत. त्यात साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ श्री अंबाबाई मंदिर आणि श्रीक्षेत्र जोतिबा या दोन महत्त्वाच्या मंदिरांचा समावेश आहे.

- समितीकडे तीन हजार मंदिरे असली तरी सर्व मंदिरांत मिळून केवळ ३० ते ४० दानपेट्या आहेत. त्यांपैकी १७ दानपेट्या एकट्या अंबाबाई मंदिरात आहेत.
- केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देवस्थान समितीने सर्व मंदिरांतील दानपेट्या उघडण्याचा निर्णय घेतला.
- अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील रकमेची मोजदाद १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्या चार दिवसांत ६३ लाख २४ हजार रुपये तिजोरीत जमा झाले.

- दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविकांचा नेहमीच राबता असतो. ८ नोव्हेंबरनंतर दानपेट्यांमध्ये जमा होणारे पैसे बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत होते. मात्र,नंतर मंदिर प्रशासनाने हजार-पाचशेच्या नोटांचा हिशोब ठेवला नाही.

सोन्या-चांदीचे अलंकार...
- देवस्थान समितीच्या कार्यालयातील दोन दानपेट्या उघडण्यात आल्या. यातून मोठ्या संख्येने सोन्या-चांदीचे अलंकार निघाले.
- भाविकांनी कमी रकमेचा सोन्या-चांदीचा दागिना अंबाबाईसाठी अर्पण केला की पावती करण्याऐवजी देवस्थानचे कर्मचारी ते दानपेटीत टाकायला सांगतात; त्यामुळे दानपेटीत सर्वाधिक अलंकार मिळाले.
- एकूण १० तोळे (१०० ग्रॅम) सोने व अर्धा किलो चांदीचा समावेश आहे.

Web Title: After annotation, donations of millions of old notes to the places of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.