दीपक तेंडुलकर यांचा अर्ज बाद

By admin | Published: November 3, 2016 02:48 AM2016-11-03T02:48:24+5:302016-11-03T02:48:24+5:30

रोहा नगर पालिका निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे.

After the application of Deepak Tendulkar | दीपक तेंडुलकर यांचा अर्ज बाद

दीपक तेंडुलकर यांचा अर्ज बाद

Next


रोहा: रोहा नगर पालिका निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रि येदरम्यान शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक तेंडुलकर यांचे अर्ज बाद झाले. तर अर्जात त्रुटी असल्याने गौरी बाळटक्के (अपक्ष) यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यातच अर्ज भरतेवेळी संदीप तटकरेंनी सेनेचा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याचे संशयास्पदरीत्या टाळल्याने ते अपक्ष उमेदवार असून नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार निवडणुकीत नसल्याची नामुष्की सेनेवर आली आहे तर संदीप तटकरेंनी सेनेला बनविले असल्याचे बोलले जात असून अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे.
रोह्यात केवळ थोरल्या तटकरेंना शह देण्यासाठी धाकट्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचे हात चांगलेच पोळून निघाले आहेत. जादूची कांडी सापडावी आणि आनंद व्हावा त्यापेक्षाचा जास्त जल्लोष शनिवारी शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी तटकरेंच्या घरातला उमेदवार सापडल्यानंतर झाला. मात्र दुसऱ्या दिवशी या उमेदवाराचे नाव अपक्षांच्या यादीत बघून सर्वांनाच धक्का बसला. अर्ज भरताना तांत्रिक चूक झाल्याचे शिवसेना आता सांगत असली तरी तटकरेंना साधा अर्जही भरता येऊ नये यावर कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळे धाकट्यांनीही शिवसेनेला टांग दिल्याची चर्चा अर्ज छाननीत दीपक तेंडुलकर यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झाल्यानंतर शहरात सुरू होती. सेनेच्या नेत्यांना साधा पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म तटकरे यांच्या उमेदवारी अर्जाला जोडता आला नाही, हा केवळ योगायोग नसावा असे समजते आहे. सेनेच्या नेत्यांनी यारी दोस्ती जपल्याचा परिणाम या निवडणुकीत सेनेला भोगावा लागत असल्याचे बोलले जात आहे. सेनेसह काँग्रेसकडून असलेले अपक्ष उमेदवार हेमंत साळवी यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. आत्ता यामुळे ही निवडणूक चुरशीची होते का? हे पहावे लागणार आहे. बुधवारी अचानक यात काही अनपेक्षित बदत झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे आता रोहेकरांचे लक्ष या नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र याचे चित्र योग्य वेळीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: After the application of Deepak Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.