Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार! दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? राणेंशी पंगा महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 09:07 AM2022-08-07T09:07:53+5:302022-08-07T09:08:12+5:30

Maharashtra Political Crisis: दीड महिन्यातच दीपक केसरकरांकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.

after bjp narayan rane complaint kiran pavaskar could replace deepak kesarkar as new spokesperson of shinde group | Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार! दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? राणेंशी पंगा महागात पडणार

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार! दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? राणेंशी पंगा महागात पडणार

Next

मुंबई:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून ऐतिहासिक बंडखोरी करत भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी केल्यापासून ते आतापर्यंत शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत दीपक केसरकर यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून ते भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यापर्यंत अनेकांवर टीकेचे आसूड ओढले. मात्र, नारायण राणे यांच्याशी घेतलेला पंगा दीपक केसरकर यांना महागात पडण्याची शक्यता असून, प्रवक्तेपदी किरण पावसकर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दीड महिन्यातच दीपक केसरकरांकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या ३ आठवड्यांपासून अनेक पत्रकार परिषदांमधून केसरकरांनी भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होईल, अशी विधाने केल्याने भाजपचे काही आमदार नाराज आहेत. त्यांनी केसरकरांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही भाजप आमदारांनी केसरकरांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्याचमुळे केसरकरांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र चांगलेच खवळले

दीपक केसरकर यांची राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. राज्यात शिंदे-फडणवीसांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी संधी मिळेत तेव्हा केसरकर नारायण राणेंवर तोफ डागत राहिले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केलेल्या गंभीर आरोपांनंतर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केसरकरांची तक्रार केली. इकडे एकनाथ शिंदे यांच्या कानावरही केसरकरांच्या अनेक तक्रारी गेल्याची माहिती आहे. या कारणांमुळे दीपक केसरकरांना हटवून त्यांच्या जागी किरण पावसकर यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

दरम्यान, गेल्या सव्वा महिन्यापासून शिंदे गट आणि भाजपातील इच्छुकांचे डोळे कॅबिनेट विस्ताराकडे लागले आहेत. शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यातच दीपक केसरकर हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ठाकरे सरकारमध्ये केसरकरांकडे कुठलंही मंत्रिपद नव्हते, पण आत्ता त्यांचे मंत्रिपद मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. 
 

Web Title: after bjp narayan rane complaint kiran pavaskar could replace deepak kesarkar as new spokesperson of shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.