गणपतीसमोरील दान पेटी चोरणाऱ्याला दोन तास ठेवले बांधून, फोटो झाला व्हायरल
By admin | Published: September 11, 2016 07:39 PM2016-09-11T19:39:29+5:302016-09-11T20:23:46+5:30
कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील चिकनघर परिसरातील सार्वजनिक गणशोत्सव मंडळाच्या मंडपातून दानपेटीची चोरी करताना एका चोरटय़ाला मंडळाच्या कार्यकत्र्यानी पकडले.
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ११ : शहराच्या पश्चिम भागातील चिकनघर परिसरातील सार्वजनिक गणशोत्सव मंडळाच्या मंडपातून दानपेटीची चोरी करताना एका चोरटय़ाला मंडळाच्या कार्यकत्र्यानी पकडले. त्याला एका खांबाला दोन तास बांधून ठेवले. तसेच
त्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महात्मा फुले पोलिसांनी चोरटय़ाला अटक केली आहे. त्याचे नाव दीपक नारायण जाधव (20) असे आहे. चोरटय़ाला खांबाला बांधल्याचा फोटोच व्हाटस्अपवर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चोरटय़ाला बांधून ठेवल्याविषयी अधिक माहिती आपणास माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही घटना दोन दिवसापूर्वीची आहे. मात्र ती व्हाटस्अपवर व्हायरल झाल्याने आज ती उजेडात आली आहे. चिकनघरचा राजा हे
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ दरवर्षी गणपती बसवते. दोन दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी दर्शन घेण्याच्या निमित्ताने दीपक मंडपात शिरला. त्याने दान पेटी चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार मंडपात उपस्थित असलेल्या मंडळाच्या काही कार्यकत्र्यानी पाहिला. त्याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याला एका खांबाला दोन तास बांधून ठेवले. तसेच त्याला मारहाण केली.
त्यानंतर दीपकला पोलिसांच्या हवाली केले. त्याला खांबाला बांधून ठेवल्याचा फोटोच व्हॉटसअपवर व्हायरल केला. फोटो व्हायरल होण्यापूर्वी पोलिसांनी दीपकला अटक केली आहे. दीपक हा लाल चौकी परिसरात राहणारा आहे. या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.