कॉल ड्रॉप झाल्यावर मिळणार १ रुपयाची भरपाई

By admin | Published: October 16, 2015 12:09 PM2015-10-16T12:09:04+5:302015-10-16T12:47:05+5:30

कॉल ड्रॉपच्या समस्येवर मोबाईल ग्राहकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे असून दिवसाला तीन कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.

After the call drops, a compensation of Rs | कॉल ड्रॉप झाल्यावर मिळणार १ रुपयाची भरपाई

कॉल ड्रॉप झाल्यावर मिळणार १ रुपयाची भरपाई

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - कॉल ड्रॉपच्या समस्येवर मोबाईल ग्राहकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे असून दिवसाला तीन कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक आयोग अर्थात ट्रायने दिले आहेत. १ जानेवारी २०१६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

मोबाईलवर बोलत असताना नेटवर्कमुळे फोन कट होण्याची समस्येने ग्राहक त्रस्त झाले आहेत.  मोदी सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असला तरी दूरंसंचार कंपन्यांच्या कामात सुधारणा झाल्याचे दिसत नाही. व्होडाफोन, एअरटेल व रिलायन्स यांच्या कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढतच आहे. टेलिकॉम कंपन्यांविरोधात आता ट्राय सरसावले असून ट्रायने कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकाला एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. दिवसभरातील तीन कॉल ड्रॉपसाठीच ही भरपाई लागू असेल.  कॉल ड्रॉप झाल्याच्या चार तासांमध्ये ग्राहकाला एसएमएस पाठवला जाईल व त्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल. तर पोस्ट पेड ग्राहकांना पुढील बिलात ही भरपाई मिळणार आहे.  

Web Title: After the call drops, a compensation of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.