शहराचा पर्यावरण अहवाल वा-यावर, खास सभा आता थेट नोव्हेंबरमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:41 AM2017-09-21T00:41:28+5:302017-09-21T00:41:30+5:30

महापालिकेचा शहराची पर्यावरणाची सद्य:स्थिती दर्शविणारा अहवाल पदाधिकारी व नगरसेवकांनी वा-यावरच सोडला आहे. जुलै २०१७मध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालाची खास सभा बुधवारीही विशेष चर्चेविना नेहमीप्रमाणे पुढे म्हणजे थेट नोव्हेंबर २०१७मध्ये प्रस्तावित करण्यात आली.

After the city's environmental report, special meeting will be held in November only | शहराचा पर्यावरण अहवाल वा-यावर, खास सभा आता थेट नोव्हेंबरमध्येच

शहराचा पर्यावरण अहवाल वा-यावर, खास सभा आता थेट नोव्हेंबरमध्येच

Next

पुणे : महापालिकेचा शहराची पर्यावरणाची सद्य:स्थिती दर्शविणारा अहवाल पदाधिकारी व नगरसेवकांनी वा-यावरच सोडला आहे. जुलै २०१७मध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालाची खास सभा बुधवारीही विशेष चर्चेविना नेहमीप्रमाणे पुढे म्हणजे थेट नोव्हेंबर २०१७मध्ये प्रस्तावित करण्यात आली. काही सदस्यांनी नको ते प्रश्न विचारून अधिकाºयांना बेजार केले व सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामुळेच हा विषय व त्यावरची खास सभा हा निव्वळ उपचारांचा प्रकार ठरला असल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. नियमाप्रमाणे हा अहवाल ३१ जुलैपूर्वी प्रशासनाने सर्वसाधारण सभेला सादर करणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तो गेली २१ वर्षे सादर करण्यात येत आहे. दर वेळी त्यासाठी खास सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर पुन्हा त्यावरील चर्चेसाठीही काही महिने खास सभा आयोजित केली जाते व तहकूब केली जाते. बुधवारची सभाही याप्रमाणेच तहकूब करून थेट २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
यावर एकाही सदस्याने काही प्रश्न विचारला नाही. गोपाळ चिंतल यांनी हा अहवाल कितवा आहे, असे विचारून मागील अहवालातील तब्बल २६ पाने या अहवालात जशीच्या तशीच घेण्यात आली आहेत, अशी टीका केली. त्याला उत्तर देताना दिघे यांनी अहवालाचा नमुना ठरलेला आहे व त्यात दर वर्षी फक्त माहितीच दिली जाते, असे स्पष्ट केले. याचा अर्थ, महापालिकेने गेल्या काही वर्षांत पर्यावरणसंवर्धनासाठी काहीही केले नाही असा होतो, अशी टीका सुभाष जगताप यांनी केली.
त्यानंतर लगेचच काही सदस्यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली.
।नमुन्यात बदल
करता येत नाही
पर्यावरण अहवालासंबधीच्या नमुना ठरलेला आहे, त्यात बदल करता येत नाही. अहवाल ३१ जुलैपूर्वी सादर करावा असा नियम आहे त्याप्रमाणे अहवाल सादर केला जातो. सभा तहकूब होत असेल तर तो सभागृहाचा अधिकार आहे. त्यावर काही बोलता येणार नाही.
मंगेश दिघे,
पर्यावरण कक्षप्रमुख, महापालिका
>सभा तहकूब
होणे अयोग्य
या वर्षीच्या अहवालातील पक्षिसंवर्धनाबाबत मीही काही सूचना केल्या होत्या. त्या अहवालात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेने पुढाकार घेऊन काही पर्यावरणतज्ज्ञांना एकत्र करून यावर चर्चा घडवून आणावी, असे वाटते. या विषयावरची सभा सातत्याने तहकूब होत असेल, तर ते योग्य नाही.
- किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ
पर्यावरण अहवालावर चर्चा करण्यासाठीच आयोजित केलेल्या या खास सभेत पर्यावरणावर चर्चा झालीच नाही. काही सदस्यांनी महापालिकेच्या पर्यावरण कक्षाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी अहवालाची माहिती द्यावी, असे सांगितले.
दिघे यांनी त्याप्रमाणे शहरातील वाहनांची संख्या, हवेचे प्रदूषण यांत वाढ होत असल्याचे स्पष्ट केले. मागील काही वर्षांची आकडेवारी त्यांनी दिली. वाहतूक, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन या पर्यावरणावर परिणाम करणाºया घटकांची माहिती त्यांनी दिली.

Web Title: After the city's environmental report, special meeting will be held in November only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.