मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांनादेखील धमकीचे फोन; चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:04 PM2020-09-07T16:04:26+5:302020-09-07T16:45:49+5:30
कंगनावर टीका केल्यानंतर अनिल देशमुख यांनादेखील धमकीचे फोन
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचं कळतं आहे.
अपयश लपविण्यासाठी भावनिक मुद्यांचा आधार; प्रवीण दरेकर यांचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन दुबईहून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दाऊदचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं. हा फोन नेमका कोणी केला होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
दाऊदच्या हस्तकाने फोनवर दिली ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी; दुबईहून आले धमकीचे फोन
पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीनं दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? मातोश्रीच्या लँडलाईनवर दुबईहून फोन कॉल कुणी केला?, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.