वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणाले, 'माझे सध्या वाईट दिवस...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 21:41 IST2020-02-16T18:35:28+5:302020-02-16T21:41:21+5:30
वादग्रस्त वक्तव्यामुळे अहमदनगरच्या PCPNDT समितीने नोटीस पाठविली आली आहे

वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणाले, 'माझे सध्या वाईट दिवस...'
बीड : माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराजांनी दिली आहे. बीडमधील एका कीर्तनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, कीर्तनस्थळी महाराजांना पाठिंबा देणारे फलक लावल्याचे पाहायला मिळाले.
बीड जिल्ह्यातील कड्याजवळच्या कुंभारवाडीत आज दुपारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना एवढा त्रास होतो. या विषयावर आता मला काहीच बोलायचे नाही, असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले. या कीर्तनावेळी काही लोकांच्या हातात 'आय सपोर्ट इंदुरीकर', 'महाराज आम्ही तुमच्यासोबत आहोत' अशा आशयाचे फलक दिसून आले.
दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ओझर येथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे अहमदनगरच्या PCPNDT समितीकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, काहींनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध सुद्धा केला. त्यामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत.
...अन् एकाएकी यूट्यूबवरुन डिलीट होऊ लागले इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांनी यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत, असे म्हणत यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.
इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या कीर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड करुन लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. याचा धसका घेऊन यूट्यूब अनेक चॅनेल चालवणाऱ्या अनेकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी बातम्या...
'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे
भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या
आबा पाटील यांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार