मृत्युनंतरही ॠत्विकची ‘ब्रेनट्यूमर’शी झुंज

By admin | Published: April 27, 2016 06:45 PM2016-04-27T18:45:15+5:302016-04-27T18:45:15+5:30

वयाच्या दहाव्या वर्षी ऋत्विकला ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रासले. कुटुंबीयांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण नियतीसमोर ते असफल ठरले. ऋत्विक त्यांच्यातून निघून गेला

After the death, the fight against 'Braintumer' | मृत्युनंतरही ॠत्विकची ‘ब्रेनट्यूमर’शी झुंज

मृत्युनंतरही ॠत्विकची ‘ब्रेनट्यूमर’शी झुंज

Next
>- पराग मगर, वर्धा
 
वयाच्या दहाव्या वर्षी ऋत्विकला ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रासले. कुटुंबीयांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण नियतीसमोर ते असफल ठरले. ऋत्विक त्यांच्यातून निघून गेला. दुसरा कोणताही ऋत्विक या आजाराने त्याच्या आई वडिलांपासून हिरावू नये, त्याला झालेल्या आजारावर अभ्यास व्हावा या उद्देशाने त्याच्या कुटुंबीयांनी सेवाग्राम रुग्णालयात त्याचा देहदान दिला. ऋत्विकच्या या देहदानाने मृत्यूनंतरही ब्रेन ट्युमरशी त्याचा लढा सुरूच राहणार आहे.
 ऋत्विक मिलिंद बोडखे हा मूळचा नागपूर येथील दर्डा रोड, रहाटे कॉलनी येथील निवासी. त्याला आजार जडल्याचे चवथ्या वर्गात असताना कळले. उपचार घेताना घरच्यांच्या चेह-यावरचे दु:ख दिसत होते.  कदाचित आपला मृत्यू त्याने पाहिला असावा असेच! त्याची आई रुग्णालयात त्याच्याशी बोलत असताना तो नेहमी म्हणायचा ‘ममा आॅल इज वेल मला काहीही होणार नाही.  मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा शाळेत जाईन.  मला कसलाही त्रास होत नाही आहे. तू काळजी करू नको’, असे म्हणतच त्याने २४ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. पाच महिन्यांपासून सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज संपली.
कोट्यवधी लोकांतून एखाद्यालाच ब्रेन ट्यूमर नामक आजार होतो. ऋत्विक तसा सामान्य कुटुंबातीलच. त्याची आई श्रूती अ‍ॅक्युप्रेशर थेरपिस्ट तर वडील मिलिंद व्यावसायिक. पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याचं डोकं जरा जास्तच दुखायला लागलं.  घरच्यांनी बालरोगतज्ज्ञांकडे नेलं.  तात्पुरतं बर वाटत असलं तरी डोकं वारंवार उमळायचं.  यामुळे डॉक्टरांनी मायग्रेनचा त्रास असावा, असं निदान केलं; पण त्याला एका डोळ्याने दिसायला त्रास होतोय. हे कळल्यावर घरच्यांचं काळीज चर्र झालं. त्याला लगेच न्युरोसर्जनकडे नेलं असता त्याला ब्रेनट्यूमर असल्याचं निदान झालं.  हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची मातीच सरकली. हा रोग कोट्यवधींमधून एखाद्यालाच होतो. त्यामुळे या रोगाची ‘केस स्टडी’ करणे कठीणच. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयात नोव्हेंबर २०१५मध्ये ॠत्विकवर पहली शस्त्रक्रिया झाली. ती यशस्वी ठरली; पण यात त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. यानंतर २० मार्चला सूरत येथे नेले. तेथून मुंबईला हलविण्यास सांगितले. मुंबईच्या फोर्टिज रुग्णालयात १ एप्रिल २०१६ रोजी न्यूरोसर्जन डॉ. दीपू बॅनर्जी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढला. त्याला सुटी देऊन चार केमोथेरपी करण्यास सांगितले. पहिली थेरपी आटोपली. कुठलीही तक्रार न करता ॠत्विकने सगळं सहन केलं. आता सगळं ठिक होईल, असं वाटत असतानाच २३ एप्रिलची रात्र त्याच्याकरिता वै-याची ठरली. २४ ला सकाळी ॠत्विकने या जगाचा कायमचा निरोप घेतला.
 
सेवाग्राम रुग्णालयात देहदान..
आपला पोटचा पोर आपल्याला उमलत्या वयात सोडून गेला. हे दु:ख पचविणं त्याच्या परिवारासाठी कठिणच होतं; पण त्याही परिस्थितीत त्याच्या पालकांनी आपल्या मुलाचा देह दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सर्वांनाच तो न पचणारा होता; पण ॠत्विकची आत्या सारिका डखरे यांनी सर्वांना समजावून सांगत या निर्णयाचा आदर करण्याची गरज व्यक्त केली. सर्वांच्या होकाराने ॠत्विकचा देह कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे दान करण्यात आला. 

Web Title: After the death, the fight against 'Braintumer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.