महिलेच्या मृत्यूनंतर पंढरपूर देवस्थानला आली जाग
By Admin | Published: June 26, 2016 07:30 PM2016-06-26T19:30:01+5:302016-06-26T19:30:01+5:30
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी येत्या महिनाभरात मंदिरात कायमस्वरूपी एक वैद्यकीय पथक आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २६ - विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी येत्या महिनाभरात मंदिरात कायमस्वरूपी एक वैद्यकीय पथक आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी आणि संजय तेली यांनी सांगितले.
मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर हृदयविकाचा झटका आलेल्या राजूबाई भगवानदास राजानी (वय ६० रा. उल्हासनगर, मुबंई) यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याची गंभीर दखल मंदिर समितीने घेतली असून लागलीच त्यांनी वैद्यकीय पथक नेमण्यासाठी जाहिरात दिली आहे. सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती होणार असून त्यातून एक एमबीबीएस, बीएएमस असलेले डॉक्टर दोन परिचारिका, दोन परिचारक (ब्रदर्स) असे पथक तैनात करण्यात येणार आहे.
मागच्या वर्षी एका शालेय विद्यार्थ्यांनीला मंदिरातच सर्पदंश झाला त्यावेळीही तीला लागलीच प्रथोमोचार मिळाले नाही की रुग्णवाहिका मिळाली नाही मात्र साप बिनविषारी असल्याने अखेर मुलीचे प्राण वाचले, त्या आधी मंदिरात भजन करत बसलेल्या वारकºयाच्या मांडीवर मंदिराच्या छताचा दगड कोसळला त्यात ते जखमी झाले तर ज्ञानेश्वर सभामंडपाच्या तिस-या मजल्यावरून एक महिला भाविक गेल्या आषाढी वारीतच भोवळ येऊन खाली पडली होती .
अशा अनेक घटना घडल्यानंतही प्रशानाकडून केवळ वैद्यकीय पथकांच्या चर्चा झाल्या मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. मात्र प्रांताधिकारी संजय तेली यांनी अखेर आज तातडीने वैद्यकीय पथकाच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
रुग्णवाहिकेसाठी बँकाकडून प्रस्ताव
मंदिराला रुग्णवाहिका देण्यासाठी काही बँकांनी मंदिराला प्रस्ताव पाठविला होता. मात्र अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी मंदिर समितीने मागणी केल्याने एका बँकेचा प्रस्ताव बँकेकडूनच बारगळला होता तर काल (शुक्रवारीच) दुस-या बँकेचा प्रस्ताव बँकेने दिला असून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे फोटोही प्रांताधिकारी तेली यांना पाठविले होते. संबंधीत बँकेने रुग्णवाहिका पंधरा दिवसात दान दिली नाही तर मंदिर समिती स्वत:च्या पैशातून रुग्णवाहिकी खरेदी करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.